India’s Cheap Sunroof Car : तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरेतर पुढील महिन्यापासून भारतात फेस्टिव सिझन सुरू होणार आहे. दरवर्षी फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या दिवसात अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात.
यंदाच्या फेस्टिवल सीझनमध्ये अनेकांना सनरूफ असणारी कार खरेदी करायची आहे. मात्र याच्या किमती जरा जास्त असतात. पण अशा कारमधून प्रवास करण्याची मजा काही औरच असते. भारतीय कार मार्केटमध्ये सनरुफ असणाऱ्या कारची किंमत इतर कारच्या तुलनेत अधिक आहे.
तथापि, भारतीय मार्केटमध्ये अशाही काही सनरुफ असणाऱ्या कार आहेत ज्यांची किंमत ही कमी आहे. दरम्यान आज आपण भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 3 पॅनोरामिक सनरूफ असणाऱ्या SUV कारची माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्ही पॅनोरामिक सनरूफ असणाऱ्या SUV घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवा.
किया सेल्टोस : Kia ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या सेल्टोस या SUV ला HTK+ प्रकारासह पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आले आहे. ज्याची किंमत ही 14.06 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र ही एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार किया कंपनीची ही कार 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्कसह 1.5-लीटर पेट्रोल इंजिन, 116hp पॉवर आणि 250Nm टॉर्कसह 1.5-लीटर डिझेल इंजिन आणि 160hp पॉवर आणि 253Nm टॉर्कसह 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह भारतीय कार मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
एमजी ॲस्टर : MG Astor ही एक लोकप्रिय SUV आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात या कारची मोठी डिमांड आहे. या गाडीचा एक मोठा चाहता वर्ग तुम्हाला पाहायला म्हणून. या गाडीच्या सिलेक्ट ट्रिममध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे.
या SUV मध्ये 110hp पॉवर आणि 144Nm टॉर्क असलेले 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT शी जोडलेले आहे. यात आणखी 1.3-लीटर, टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय आहे, जो 140hp पॉवर आणि 220Nm टॉर्कसह येतो. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Mahindra XUV 3X0 : महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. महिंद्राने अलीकडेच लॉन्च केलेली XUV 3XO ही भारतातील सर्वात स्वस्त पॅनोरामिक सनरूफ असलेली SUV कार आहे.
हे वैशिष्ट्य टॉप-एंड AX7 ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते. XUV 3XO ही भारतातील एकमेव कॉम्पॅक्ट SUV आहे जी पॅनोरॅमिक सनरूफ देते हे विशेष.
यामुळे जर तुम्हाला कमी किमतीत सनरुफ असणारी गाडी खरेदी करायची असेल तर महिंद्रा कंपनीची ही SUV तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.