‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार ! देतात 28 किलोमीटरचे मायलेज, किंमत आहे 7 लाखांच्या आत

Tejas B Shelar
Published:
Indias Cheapest CNG Car

Indias Cheapest CNG Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इंधनाच्या किमतीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलही शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मोठी हैराण झाली आहे.

इंधनाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसवत आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब अधिकच्या मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करण्याला अधिक महत्त्व दाखवत आहेत. यामुळे अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी भारतात दमदार मायलेजच्या कार लॉन्च केलेल्या आहेत.

याशिवाय सीएनजी कार देखील मोठ्या प्रमाणात बाजारात लाँच होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलला विकल्प म्हणून सीएनजी कार फायदेशीर ठरत आहेत.अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सीएनजी कार खरेदी करण्याला पसंती दाखवत आहे.

तथापि अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार कोणत्या आहेत याविषयी विचारणा केली जात होती. अशा परिस्थितीत आज आपण भारतातील सर्वात स्वस्त टॉप 3 सीएनजी कारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतातील स्वस्त सीएनजी एसयुव्ही कार

Tata Punch : टाटा ही भारतातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा पंच ही देखील अशीच एक लोकप्रिय SUV आहे. ही गाडी एकूण 5 व्हेरियंटमध्ये येते. टाटा पंच ही देशातील सर्वात स्वस्त CNG SUV पैकी एक आहे.

कंपनीचा दावा आहे की Tata Punch सीएनजी SUV 26 किमी पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 6.13 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही किंमत एक्स शोरूम आहे. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

ह्युंदाई Exter : ह्युंदाई कंपनीची ही अलीकडेच लॉन्च झालेली एक लोकप्रिय SUV आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त एसयुव्ही कार आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही 6.13 लाख रुपये एवढी आहे. ह्युंदाई Exter CNG तब्बल 27 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Maruti Fronx : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. ही गाडी बलेनो या हॅचबॅक कार पासून प्रेरित आहे. ही गाडी अलीकडेच लॉन्च झाली आहे. या गाडीचे सीएनजी मॉडेल 28.51 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मारुती सुझुकीची ही लोकप्रिय सीएनजी गाडी 7.51 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. तथापि ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe