iPhone 14 Plus च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ! आता फक्त ‘इतक्या’ हजारात खरेदी करता येणार

Tejas B Shelar
Published:
iPhone 14 Plus Rate

iPhone 14 Plus Rate : नजीकच्या भविष्यात अँपलचा iPhone खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना आयफोन 14 प्लस खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. खरंतर एप्पल लवकरच आयफोन 16 सिरीज लॉन्चं करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांनी भारतीय बाजारात आयफोन 16 सिरीज दाखल होणार आहे.

दरम्यान नवीन सिरीज बाजारात दाखल होण्यापूर्वीच कंपनीकडून आपल्या काही आधीच्या मॉडेलच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. याशिवाय फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स साइटवर देखील बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे.

आयफोन 14 प्लस वर मोठी सूट मिळत आहे. यामुळे ज्यांना आयफोन 14 प्लस खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी राहणार आहे. या हँडसेटच्या किमतीत मोठी कपात झाली आहे.

ॲपल कंपनीचा हा हँडसेट ज्यावेळी लॉन्च झाला होता त्यावेळीच्या किमतीशी तुलना केली असता सध्याची किंमत ही खूपच कमी आहे. हा हँडसेट लॉन्च प्राईस पेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची एक मोठी संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

या हँडसेटवर फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण फ्लिपकार्ट वर सुरू असणाऱ्या या ऑफर बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. 

फ्लिपकार्टवर आयफोन 14 प्लस वर किती डिस्काउंट मिळतोय

सध्या फ्लिपकार्ट वर आयफोन 14 प्लस हा 50 हजार रुपयांना उपलब्ध आहे. खरंतर आयफोन 14 प्लस ची सुरुवातीची किंमत 55 हजार 999 म्हणजेच 56 हजार एवढी आहे. मात्र या हँडसेटच्या खरेदीवर फ्लिपकार्ट वर सध्या चार हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट उपलब्ध आहे.

याशिवाय या हँडसेटच्या खरेदीवर अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे. आयफोन 14 प्लस या हँडसेटच्या खरेदीवर अतिरिक्त 2000 रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे.

म्हणजेच 4000 रुपयाचा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि अतिरिक्त 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट असा एकूण ₹6,000 रुपयांचा डिस्काउंट या मोबाईलवर मिळणार असून हा मोबाईल फ्लिपकार्टवर अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हा कंपनीचा एक लोकप्रिय हँडसेट असून आयफोनच्या या मॉडेलची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe