Jeep New Suv : टोयोटा Fortuner ही प्रीमियम Suv भारतात फारच लोकप्रिय आहे. आता याच घोड्याला टक्कर देण्यासाठी नवीन Suv आता बाजारात आली आहे. जीप इंडियाने भारतात अखेर अपडेटेड 2026 जीप मेरेडियन ही 3-रो प्रीमियम SUV अधिकृतपणे लॉन्च केली आहे.
या SUV ची सुरुवातीची किंमत 30.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. 2026 मॉडेल ईयर अपडेटमध्ये जीपने एक महत्त्वाचा बदल केला असून, तो विशेषतः कुटुंबांसाठी आणि लांब प्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आता सेकंड-रो स्लाइडिंग सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्या लिमिटेड (Limited) आणि ओव्हरलँड (Overland) व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत.

2026 जीप मेरेडियनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नवीन सेकंड-रो सीट सेटअप. या सीट्स आता 140mm पर्यंत पुढे-मागे स्लाइड होऊ शकतात. यामुळे प्रवाशांच्या गरजेनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील लेगरूम वाढवता येतो किंवा बूट स्पेस अधिक मिळवता येतो.
40:60 स्प्लिट सेकंड-रोमध्ये लहान भाग 310mm तर मोठा भाग 290mm पर्यंत स्लाइड होतो. शिवाय, सीट्स 33 अंशांपर्यंत पुढे झुकतात, ज्यामुळे तिसऱ्या रांगेत प्रवेश करणे अधिक सोपे झाले आहे. आरामदायी प्रवासासाठी सीटचा टॉर्सो अँगल 23 अंश ठेवण्यात आला असून, त्यात 12 अंश अतिरिक्त रिक्लाइन मिळतो.
डिझाइन आणि प्रीमियम फील
डिझाइनच्या बाबतीत 2026 जीप मेरेडियनमध्ये मोठे बदल नाहीत. जीपची ओळख असलेली 7-स्लॉट ग्रिल, LED लाइट्स आणि दमदार रोड प्रेझेन्स कायम आहे. केबिनमध्ये सॉफ्ट-टच मटेरियल आणि प्रीमियम फिनिशमुळे लक्झरी फील मिळतो.
फीचर्स आणि टेक्नोलॉजी
SUV मध्ये पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड व इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री मिळते. टेक्नोलॉजीमध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. Uconnect प्लॅटफॉर्मद्वारे 30 हून अधिक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत.
सेफ्टी, इंजिन आणि किंमत
2026 जीप मेरेडियनमध्ये 70 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स असून, निवडक व्हेरिएंट्समध्ये ADAS देखील मिळते. इंजिनमध्ये कोणताही बदल न करता 2.0-लीटर टर्बो डिझेल इंजिन (170hp, 350Nm) देण्यात आले आहे. ARAI मायलेज 16.25 kmpl पर्यंत आहे.
अपडेटेड 2026 जीप मेरेडियनची किंमत 30.01 लाखांपासून सुरू होते, तर संपूर्ण मेरेडियन रेंजची सुरुवातीची किंमत 23.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.













