Jio Airfiber Recharge : रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो कस्टमर आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
कंपनीकडून ब्रॉडबँडसाठी जिओ एअर फाइबर लॉन्च करण्यात आले आहे. जर तुम्ही ही अनलिमिटेड इंटरनेट साठी ब्रॉडबँड घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरणार आहे.
म्हणजे यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा तर मिळणारच आहे शिवाय काही ओटीटी एप्लीकेशनचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे.
एवढेच नाही तर टीव्ही चॅनल्स देखील असतील. अर्थातच जिओ एअर फाइबर इन्स्टॉल केल्यास तुम्हाला सेटटॉप बॉक्स लावण्याची देखील गरज राहणार नाही.
दरम्यान जर तुम्हीही जिओ फायबर इन्स्टॉल करण्याच्या तयारीत असाल तर आज आपण जिओ एअर फायबरच्या एका स्वस्त प्लॅनची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती.
599 चा प्लॅन ठरणार फायदेशीर
Jio Air Fiber चा हा सर्वात स्वस्त आणि कीफायतशीर प्लॅन आहे. आपल्याने रिचार्ज केल्यास ग्राहकांना 30 एमबीपीएसचा स्पीड मिळतो.
अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट तर मिळतेच शिवाय याची व्हॅलिडीटी देखील तब्बल 30 दिवसांची आहे. यामुळे तुम्हाला एक महिना अनलिमिटेड इंटरनेटचा ॲक्सेस फक्त आणि फक्त 599 मध्ये मिळणार आहे.
तसेच यात 13 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन देखील मिळेल. यासोबतच या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलसह दररोज शेकडो एसएमएसचा बेनिफिट देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शिवाय, या प्लॅन सोबत रिचार्ज केल्यास ग्राहकांना 550 हून अधिक टीव्ही चॅनेलचा लाभ घेऊ शकतात. OTT मध्ये Disney Plus Hotstar, Jio Cinema, Jio TV आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मचा समावेश राहणार आहे. हा प्लॅन जिओच्या ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.