Tata Punch EMI Plan : प्रत्येकाला आपल्या घरासमोर चारचाकी असावी हे स्वप्न असते व आताच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून बघितले तर शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळाल्यानंतर लगेचच कार घेण्याची तयारी सुरू होते.
यामध्ये जर आपण भारतीय कार बाजारपेठेतील कारच्या किमती पाहिल्या तर त्या बऱ्याचदा काही लाखांमध्ये आहेत. यामुळे अनेकांना कारचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे साहजिकच कार लोनचा पर्याय स्वीकारला जातो व लोन घेऊन कार आणली जाते.
सध्या जर आपण भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर सध्या एसयूव्ही सेगमेंटमधील कार खरेदी करण्याकडे जास्त कल आपल्याला दिसून येतो. कारण या कारच्या किमती कमी आणि डिझाईन व उत्तम अशी वैशिष्ट्य असल्यामुळे एसयूव्ही कार खरेदी करण्याकडे आपल्याला ग्राहकांची पहिली पसंती दिसते.
त्यामुळे तुम्हाला देखील एखादी एसयूव्ही खरेदी करण्याची इच्छा असेल व येणारा सणासुदीचा कालावधी आनंदामध्ये साजरा करायचा असेल तर तुम्ही मायक्रो एसयूव्ही टाटा पंच खरेदी करू शकतात. जर आपण टाटाच्या या कार विषयी बघितले तर ही टाटा कंपनीची सगळ्यात जास्त विक्री होणारी कार पैकी एक आहे.
किती आहे टाटा पंच प्युअर कारची किंमत?
जर आपण टाटाच्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या टाटा पंच कारचे बेस मॉडेल बघितले तर ते टाटा पंच प्युअर असून त्याची किंमत 6 लाख 12 हजार 900 रुपये आहे. तसेच ऑन रोड किंमत पाहिली तर ती वाढते व ती तब्बल 6 लाख 91 हजार 114 रुपये होते. जर तुम्हाला टाटा पंच खरेदी करायची असेल व तुमच्याकडे जर आवश्यक तेवढा बजेट नसेल तर तुम्ही कार लोन घेऊन ही कार विकत घेऊ शकतात.
पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा टाटा पंच
जर आपण ऑनलाइन कार फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटर नुसार विचार केला तर टाटा पंच तुम्ही अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या बजेटमध्ये म्हणजेच डाऊन पेमेंट भरून खरेदी करू शकतात. पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही बँकेकडून या कारकरीता सहा लाख 41 हजार 114 रुपयांचे कर्ज घेऊ शकतात.
बँकेच्या माध्यमातून या कर्जावर 9.8% वार्षिक व्याजदर आकारला जाऊ शकतो. पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट देऊन बाकीचे लोन घेऊन तुम्ही पुढील पाच वर्षे बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या लोनचे पैसे भरू शकता व याकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,119 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
टाटा पंचचे इंजिन कसे आहे?
टाटाच्या या टाटा पंच कारमध्ये 119 सीसीचे तीन सिलेंडर इंजन असून ते 86.63 बीएचपीची पावर आणि 115 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये इंजिनसोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.या कारचे मायलेज बघितले तर कंपनी असा दावा करते की, ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 18.8 किलोमीटरचे मायलेज देते.