कॅश तयार ठेवा ! भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार ‘या’ 3 नवीन इलेक्ट्रिक कार ! पहा संपूर्ण लिस्ट

Upcoming Electric Car List : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. खरे तर वाढते प्रदूषण, पेट्रोल डिझेलसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा खर्च या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रोत्साहित केले जात आहे. सर्वसामान्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागल्या आहेत. विविध कंपन्या आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले पाय रोवत आहेत. दरम्यान इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे भारतीय बाजारात लवकरच तीन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला कॅश तयार ठेवावी लागणार आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक कार होणार लाँच

ह्युंदाई क्रेटा EV : ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीने भारतात अनेक मॉडेल लॉन्च केले आहेत. कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. दरम्यान कंपनीकडून आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत व्हावा यासाठी आपल्या लोकप्रिय गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय बाजारात लॉन्च केले जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार ह्युंदाई ही कंपनी आपल्या लोकप्रिय क्रेटा या मॉडेलचे इलेक्ट्रिक वर्जन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी पाचशे किलोमीटर पर्यंतची रेंज देण्यास सक्षम राहणार असे बोलले जात आहे. अर्थातच ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर पर्यंत धावणार आहे.

मारुती सुझुकी eVX : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. मात्र ही कंपनी सध्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये खूपच कमजोर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता कंपनीकडून आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ देखील चांगला मजबुत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कंपनीकडून या वर्षाच्या अखेरीस आपली पहिली इलेक्ट्रिक कार eVX लॉन्च केली जाणार आहे.

ही मध्यम आकाराची इलेक्ट्रिक SUV दोन बॅटरी पर्यायांसह येण्याची अपेक्षा आहे आणि ती फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध राहणार आहे. असे म्हटले जात आहे की 60 kWh बॅटरी पॅकसह ते सुमारे 550 किमीची रेंज देऊ शकते.

Citroen eC3 एअरक्रॉस : Citroen कंपनी बाजारात मोठा धमाका करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी C3 Aircross midsize SUV ची इलेक्ट्रिक आवृत्ती 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला सादर करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीकडून या बाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे. आगामी कार 5 आणि 7 सीट लेआउटमध्ये सादर केली जाऊ शकते. कारची ड्रायव्हिंग रेंज 450 किमी पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe