Kia Syros EV होणार लॉन्च ! मिळेल जबरदस्त रेंज आणि अत्याधुनिक Technology

Published on -

Kia Syros EV :- किआ सायरोस ईव्ही लवकरच भारतात लाँच होणार आहे. यामुळे भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात एक मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि अनेक कार कंपन्या त्यांच्या पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल कार्सना इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये रूपांतरित करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर किआ इंडियाने त्यांची नवीन एसयूव्ही सायरोस लाँच केली आहे आणि आता या कारचा इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील भारतात लाँच होणार आहे.

Kia Syros EV

किआ सायरोस ईव्हीचे इलेक्ट्रिक वेरियंट 14 ते 20 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात हे टाटा नेक्सॉन ईव्हीसोबत मुख्य स्पर्धा करेल. जो सध्या या सेगमेंटमधील एक प्रमुख आहे. सायरोस ईव्हीमध्ये दोन प्रकारचे बॅटरी पॅक असू शकतात.42 किलोवॅट आणि 49 किलोवॅट ज्यामुळे त्याची रेंज 300 किमी ते 355 किमीपर्यंत होईल. सायरोस ईव्हीच्या लाँचची तारीख 2026 च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते मार्च 2026 मध्ये अपेक्षित आहे.

कसे असेल डिझाईन ?

सायरोस ईव्हीचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये अद्याप अंतिम स्वरूपात आलेली नाहीत. परंतु ते सध्याच्या सायरोसच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटसाठी काही सुधारणासहित असू शकते.सायरोसच्या सध्याच्या वेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17 लाख रुपयांपर्यंत जाते. तथापि काही तज्ञांच्या मते, या कारचे डिझाइन थोडे कमकुवत आहे आणि किमतीच्या बाबतीत हे आकर्षक वाटत नाही. मारुती सुझुकी ब्रेझा या कारची तुलना सायरोससोबत केली जात असली तरी ब्रेझा किमतीच्या बाबतीत एक चांगला पर्याय म्हणून मानली जात आहे.

इंजिन पर्याय कोणते ?

सायरोसच्या इंजिनच्या बाबतीत, त्यात 1-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन पर्याय दिले जात आहेत. 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह 18.20 किमी प्रति लिटर मायलेज देते.तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 17.68 किमी प्रति लिटर मायलेज मिळते. डिझेल इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्ससह 20.75 किमी प्रति लिटर मायलेज देते तर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 17.65 किमी प्रति लिटर मायलेज मिळते.

हे मायलेज कंपनीकडून दिलेले आहे.परंतु प्रत्यक्ष वापरामध्ये हे मायलेज कसे असते? हे ग्राहकांना अनुभवावरूनच कळेल. या सर्व बाबी लक्षात घेतल्यास किआ सायरोस ईव्ही भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात एक महत्त्वाची स्पर्धा निर्माण करणार आहे. परंतु त्याची बाजारपेठेतील स्पर्धा टाटा नेक्सॉन ईव्हीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धकांशी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe