Kia Syros vs Sonet:- जर तुम्ही नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर किआच्या दोन लोकप्रिय मॉडेल्स Kia Syros आणि Kia Sonet यांचा विचार नक्कीच करावा लागेल. दोन्ही कार त्यांच्या सेगमेंटमध्ये दमदार कामगिरी करत असून ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवत आहेत.
किआने अलीकडेच सायरोसच्या किमती जाहीर केल्या असून त्यामुळे सोनेटशी तुलना करणे अधिक सोपे झाले आहे. पण प्रश्न असा आहे की, तुमच्या बजेटसाठी आणि गरजांसाठी कोणती कार सर्वोत्तम ठरेल? चला तर मग या विषयी माहिती घेऊ.

किंमत आणि इंजिनमधील फरक
किआ सायरोसची सुरुवातीची किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होते.तर सोनेटची किंमत 9.15 लाख रुपयांपासून सुरू होते. दोन्ही मॉडेल्समध्ये इंजिनच्या बाबतीत महत्त्वाचा फरक आहे.
सायरोस फक्त 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. तर सोनेटमध्ये 1.2-लिटर नॅचरल एस्पिरेटेड इंजिन आणि टर्बो पेट्रोलचा पर्याय देखील आहे. यामुळे ज्या ग्राहकांना विविध पर्याय हवे असतील त्यांच्यासाठी सोनेट अधिक अनुकूल ठरू शकते.
डिझेल प्रकारात कोणता पर्याय चांगला?
किआ सायरोस आणि सोनेट दोन्ही गाड्या डिझेल इंजिन पर्यायांसह येतात. मात्र त्यांच्यात किंमतीतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. सोनेटच्या एचटीई डिझेल व्हेरिएंटची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
तर सायरोसच्या एचटीके पर्यायाची किंमत 11 लाख रुपये आहे. यावरून स्पष्ट होते की, सोनेटचे डिझेल व्हेरिएंट तुलनेने अधिक परवडणारे आहे.
टॉप मॉडेल्सच्या किमती आणि वैशिष्ट्ये
जर टॉप मॉडेल्सची तुलना केली तर सोनेट GTX Plus AT ची किंमत 15.70 लाख रुपये आहे.तर सायरोसच्या HTX+ AT व्हेरिएंटची किंमत 17 लाख रुपये आहे.
म्हणजेच सायरोसचे टॉप मॉडेल सोनेटच्या तुलनेत अधिक महाग आहे. तथापि सायरोसमध्ये अधिक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतात. जसे की, मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, प्रगत सेफ्टी फीचर्स आणि अधिक स्पेस यांचा समावेश यामध्ये होतो.
प्रीमियम फीचर्सच्या तुलनेत कोणते अधिक फायदेशीर?
सायरोस ही एक मोठी आणि अधिक प्रीमियम एसयूव्ही आहे. जी आकर्षक इंटीरियर, आधुनिक फीचर्स आणि अधिक आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. दुसरीकडे सोनेट ही एक स्टायलिश आणि तुलनेने परवडणारी एसयूव्ही आहे.जी अत्याधुनिक ड्रायव्हिंग अनुभव देते.
कोणती एसयूव्ही खरेदी करावी?
जर तुम्ही प्रीमियम फीचर्स आणि मोठ्या एसयूव्हीसाठी तयार असाल तर किआ सायरोस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र जर तुम्हाला बजेटच्या मर्यादेत राहून एक परवडणारी आणि स्टायलिश एसयूव्ही हवी असेल तर किआ सोनेट एक चांगला पर्याय आहे. दोन्ही गाड्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.













