महिंद्रा लवकरच लाँच करणार ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार ! एकदा चार्ज केल्यावर 450 किलोमीटर पर्यंत चालणार, वाचा संपूर्ण तपशील

Tejas B Shelar
Published:
Mahindra And Mahindra Upcoming Car

Mahindra And Mahindra Upcoming Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा दबदबा वाढत आहे. देशात आता हळूहळू का होईना पण इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात देखील आता इलेक्ट्रिक कार सहजतेने नजरेस पडू लागल्या आहेत. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे हे विशेष. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे.

ऑटो कंपन्या देखील आता भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन वाढवत आहेत. मात्र असे असले तरी सध्या स्थितीला इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचं बॉस आहे. टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ सर्वाधिक स्ट्रॉंग आहे.

यामुळे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विक्री करण्याचा विक्रम टाटा कंपनीच्या नावावरच आहे. पण आता टाटा कंपनीला आव्हान देण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. महिंद्रा देखील लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनी XUV.e9 ही नवीन इलेक्ट्रिक कार एप्रिल 2025 मध्ये लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे.

ही कार नुकत्याच काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये ट्रायल दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. या आगामी कारमध्ये सेडानप्रमाणे मागील बाजूस मोठी बूट स्पेस दिली जाणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फिचर्स अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी राहणार महिंद्राची अपकमिंग इलेक्ट्रिक कार

मीडिया रिपोर्ट नुसार, Mahindra XUV.e9 हे INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. ही गाडी 5 सीटर असेल. यामुळे या गाडीत ग्राहकांना मोठी बूट स्पेस मिळणार आहे. XUV.e9 मध्ये लिफ्टबॅक बूट ओपनिंग दिलेले राहणार आहे.

XUV.e9 च्या इंटीरियरमध्ये देखील ग्राहकांना एक प्रीमियम टच मिळणार आहे. त्याच्या केबिनमधील सीट्स हलक्या रंगाच्या लेदर मटेरियलने झाकलेल्या राहणार आहेत.

या गाडीच्या आतमध्ये पुढील भागात ऑटोमॅटिक गियर लीव्हर, 2-कप होल्डर, ऑटो-होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि रोटरी डायलसह नवीन सेंटर कन्सोल दिला जाणार आहे.

याशिवाय, या नवीनतम इलेक्ट्रिक कारमध्ये 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी ड्युअल-कनेक्टेड स्क्रीन देखील मिळणार आहे. कंपनी यात मोठ्या स्क्रीनची इन्फोटेनमेंट सिस्टम देईल असे बोलले जात आहे.

यामुळे दमदार मायलेज आणि फीचर्स असणारी ही कार ग्राहकांना आवडेल असा विश्वास कंपनीला आहे. या आगामी इलेक्ट्रिक कार मध्ये 80 Kwh चे बॅटरी पॅक दिले जाणार असून ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 450 किलोमीटर पर्यंत चालणार आहे. निश्चितच या गाडीची ड्रायव्हिंग रेंजही दमदार राहणार आहे.

या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर काही मीडिया रिपोर्ट मध्ये ही गाडी जवळपास 38 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते असा दावा केला जात आहे. अर्थातच ही एक प्रीमियम गाडी असेल अन यामुळे या गाडीची किंमतही अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe