Mahindra BE.05 : महिंद्रा अनेक दिवसांपासून एका इलेक्ट्रिक SUV वर काम करत होती. लवकरच ही इलेक्ट्रिक SUV बाजारात लाँच केली जाणार आहे. जी अवघ्या 30 मिनिटांत चार्ज होऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. आगामी SUV 450 किमी रेंज देईल.
दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता कंपनीनेही आपली इलेक्ट्रिक SUV Mahindra BE.05 लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी यात शानदार फीचर्स देऊ शकते. यात तुम्हाला जबरदस्त पॉवरट्रेन पाहायला मिळेल.
कशी असेल आगामी कार
या इलेक्ट्रिक एसयूव्हीवरून ज्यावेळी एक संकल्पना म्हणून पडदा उचलला, त्या वेळी ही कार मोठ्या प्रमाणात फ्युचरिस्टिक डिझाइन असणारी कार होती. या कारचे चाचणी मॉडेल संकल्पनेशी खूप साम्य आहे. रिपोर्ट्सनुसार, चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीजवळ चाचणी दरम्यान हे मॉडेल दिसले आहे.
त्याच्या बाह्य पॅनेलवर देण्यात आलेल्या क्रीज लाइन्स, कट्स इत्यादी संकल्पना मॉडेलमध्ये गुळगुळीत करण्यात आल्या आहेत, तसेच कॅमेऱ्यांनी विंग मिररची जागा घेण्यात आली आहे. या कारमध्ये फ्लेर्ड व्हील कमानी खाली टोन करण्यात आल्या आहेत, तसेच यात विंडो लाइन संकल्पना मॉडेलपेक्षा थोडी पारंपारिक दिसते. कंपनीकडून यात सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स कायम ठेवले आहे.
कंपनी BE.05 हे चार-दरवाजा असणाऱ्या SUV-कूप शैलीसह सादर करत असून जे याला अतिशय अनोखा लुक देईल. ज्यावेळी त्याचे कॉन्सेप्ट मॉडेल सादर करण्यात आले त्यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती या कारच्या लूक आणि डिझाइनची. संकल्पना मॉडेल BE.05 ची लांबी 4,370 मिमी, रुंदी 1,900 मिमी, उंची 1,635 मिमी आणि 2,775 मिमीचा व्हीलबेस दिला आहे.या कारच्या प्रॉडक्शन व्हर्जनलाही असाच फूटप्रिंट मिळू शकतो. परंतु, कंपनी गरजेनुसार त्यात बदल करण्याची शक्यता आहे.
यात SUV-कूप दिले असल्याने, त्याला एक उतार असणारी छप्पर मिळते जी कारच्या मागील बाजूपर्यंत चालते. तसेच यामध्ये मागील बाजूस C-आकाराचे टेल लॅम्प दिले असून जे जोरदार शैलीतील बंपरवर बसवण्यात आले आहेत. प्रॉडक्शन रेडी मॉडेलचे चित्र अजून स्पष्ट झाले नाही परंतु कंपनी त्याच्या मागील भागात काही बदल करण्याची शक्यता आहे.
या कारची इंटीरियरची कोणतीही छायाचित्रे समोर आली नसली तरी जर आपण कॉन्सेप्ट मॉडेल पाहिले तर कंपनीकडून त्यात ड्युअल-स्क्रीन लेआउट देण्यात आले होते. तसेच, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे इंटीरियर आणखी प्रीमियम बनवतात. यामध्ये रोटरी कंट्रोल सिस्टीमसह मोठा गियर सिलेक्टर दिला जात आहे. एकूणच, कंपनीच्या आगामी कारचे इंटिरियर खूप समृद्ध आणि प्रीमियम असेल.
पॉवरट्रेन
कंपनीची बॉर्न-इलेक्ट्रिक (BE) श्रेणी सर्व-नवीन INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित असून या कारच्या पॉवरट्रेन किंवा बॅटरी पॅकबद्दल अजूनही कोणतीही माहिती सामायिक करण्यात आली नाही. परंतु असे मानले जाते की कंपनी यात 60-80kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देईल. तसेच या SUV ला 175kW चा चार्जर सपोर्ट मिळू शकतो.
हा चार्जर केवळ 30 मिनिटांत 80% पर्यंत बॅटरी चार्ज करण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ड्रायव्हिंग रेंजचा संबंध आहे, 80kWh बॅटरीपासून 450 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.
या दिवशी होणार लाँच
सध्या ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सुरुवातीच्या टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू केली असून ती कालांतराने, प्रकल्प अधिक परिपक्वहोऊ शकते. या मॉडेलमध्ये खूप बदल करण्यात येतील. कंपनी ऑक्टोबर 2025 पर्यंत बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. महिंद्रा आपल्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहे.