इलेक्ट्रिक कारचा गेम चेंजर! Mahindra ची BE 6 आणि XEV 9e नवी क्रांती घडवणार

महिंद्राने नुकतीच आपल्या दोन अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार BE 6 आणि XEV 9e च्या लाँचची घोषणा केली आहे. या गाड्यांनी त्यांच्या उच्च कामगिरी, प्रगतीशील वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाइनमुळे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Mahindra BE 6:- महिंद्राने नुकतीच आपल्या दोन अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार BE 6 आणि XEV 9e च्या लाँचची घोषणा केली आहे. या गाड्यांनी त्यांच्या उच्च कामगिरी, प्रगतीशील वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाइनमुळे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महिंद्राचे चाहते काही काळापासून या गाड्यांच्या बाजारात येण्याची प्रतीक्षा करत होते आणि आता कंपनीने अखेर BE 6 आणि XEV 9e च्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमती आणि डिलिव्हरी वेळापत्रकांची घोषणा केली आहे.

बुकिंग केव्हा सुरू होईल?

कंपनीने जाहीर केले की या दोन्ही इलेक्ट्रिक गाड्यांच्या बुकिंग प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. तथापि ग्राहकांना बुकिंग सुरू होण्यापूर्वी 6 फेब्रुवारीपासून सकाळी 10 वाजता कंपनीच्या अधिकृत वेबसाइट “mahindraelectricsuv.com” वर जाऊन त्यांच्या पसंतीच्या मॉडेल आणि व्हेरिएंटची तपासणी करण्याची संधी मिळेल.

बॅटरी पॅकवर आधारित किमती

महिंद्राने आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या विविध व्हेरिएंट्ससाठी किंमती बॅटरी पॅकच्या आधारावर ठरवल्या आहेत. BE 6 आणि XEV 9e साठी उपलब्ध असलेल्या पॅक प्रकारांचे तपशील काही प्रमाणात वेगवेगळे आहेत. पॅक 1 प्रकार ज्यामध्ये 59 kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंट्सचा समावेश आहे.

त्याची किंमत BE 6 (59 kWh) साठी 18.90 लाख आहे,ल. BE 6 (79 kWh) साठी 20.50 लाख आहे आणि XEV 9e (59 kWh) साठी 21.90 लाख आहे. या प्रकारांची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.

दुसऱ्या पॅक प्रकारांमध्ये पॅक २ प्रकारचा समावेश आहे. ज्यात 59 kWh बॅटरी असलेले व्हेरिएंट्स आहे आणि त्यांची किंमत BE 6 (59 kWh) साठी 21.90 लाख आणि XEV 9e (59 kWh) साठी 24.90 लाख आहे. या व्हेरिएंट्सची डिलिव्हरी जुलै 2025 पासून सुरू होईल.

पॅक ३ सिलेक्ट व्हेरिएंटमध्ये BE 6 (59 kWh) आणि XEV 9e (59 kWh) यांची किंमत अनुक्रमे 24.50 लाख आणि 27.90 लाख ठेवली आहे. यांची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरू होईल.

त्याचप्रमाणे, टॉप ऑफ द लाईन व्हेरिएंटमध्ये BE 6 (79 kWh) आणि XEV 9e (79 kWh) यांची किंमत अनुक्रमे 26.90 लाख आणि 30.50 लाख आहे. या प्रकाराची डिलिव्हरी मार्च 2025 पासून सुरू होईल.

ही सर्व किंमत एक्स-शोरूम किमती आहेत, आणि त्यात चार्जर आणि इन्स्टॉलेशन शुल्क समाविष्ट नाही. ग्राहक आपल्या आवडीप्रमाणे चार्जर निवडू शकतात. उपलब्ध चार्जर्सची किंमत असं आहे की 7.2 किलोवॅट चार्जर 50000 अतिरिक्त खर्च होईल.

तर 11.2 किलोवॅट चार्जर 75000 अधिक किंमत असणार आहे. हे चार्जर्स एकाच वेळी दोन किंवा अधिक वाहने चार्ज करण्यास परवानगी देतात. डिलिव्हरीच्या वेळी प्रत्येक प्रकारावर अंतिम किंमत लागू होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe