Mahindra Bolero EMI Calculation:- भारतीय बाजारपेठेत महिंद्रा बोलेरो ही एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह 7-सीटर एसयूव्ही आहे. मजबूत बांधणी, दमदार इंजिन आणि उत्तम परफॉर्मन्समुळे ही कार शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये विशेष मागणी असलेली आहे. विशेषतः व्यावसायिक वापरासाठी आणि कुटुंबासाठी ही एसयूव्ही योग्य पर्याय मानली जाते.
महिंद्रा बोलेरोची किंमत 9.79 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 10.91 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ऑन-रोड किंमत टॅक्स आणि विमा शुल्क समाविष्ट केल्यावर आणखी वाढते. ही कार विकत घेण्यासाठी एकाचवेळी संपूर्ण रक्कम भरावी लागेल असे नाही.तर EMI योजनेच्या माध्यमातूनही तुम्ही सहज खरेदी करू शकता.

बोलेरो ईएमआय कॅल्क्युलेशन
जर तुम्ही महिंद्रा बोलेरो B4 डिझेल व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिल्लीसाठी या गाडीची ऑन-रोड किंमत 11.26 लाख आहे. यासाठी तुम्हाला किमान 1.13 लाख डाउन पेमेंट भरावे लागेल आणि उर्वरित रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात देऊ शकते.
बँक तुमचा क्रेडिट स्कोअर आणि इतर आर्थिक पात्रतेनुसार सुमारे 10.13 लाख कर्ज मंजूर करू शकते. या कर्जावर बँक ठराविक व्याजदर आकारते. जो बहुतेकवेळा 9% दरम्यान असतो. तुम्ही कर्जाचा कालावधी किती वर्षांचा निवडता यावर तुमच्या मासिक हप्त्याचा (EMI) आकडा ठरतो.
कर्ज घेण्याचा कालावधी आणि ईएमआय
जर तुम्ही चार वर्षांसाठी कर्ज घेतले, तर दरमहा सुमारे 25,206 EMI भरावा लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाच वर्षांसाठी कर्ज घेतले, तर हा EMI 21,000 इतका राहील. सहा वर्षांसाठी कर्ज घेतल्यास EMI कमी होऊन 18,258 होईल.तर सात वर्षांसाठी कर्ज घेतल्यास EMI आणखी कमी होऊन 16,300 दरमहा भरावा लागेल.
EMI कमी करण्यासाठी तुम्ही डाउन पेमेंट वाढवू शकता. त्यामुळे कर्जाची रक्कम आणि त्यावर लागणारे व्याज कमी होईल. याशिवाय चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर बँका तुलनेने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात.
महिंद्रा बोलेरो फायद्याची का?
महिंद्रा बोलेरो ही तिच्या मजबूत डिझाइनमुळे आणि उत्कृष्ट डिझेल इंजिनमुळे खास ओळखली जाते. खराब रस्ते, खडतर हवामान आणि जड वाहतुकीच्या परिस्थितीत ही कार उत्तम कामगिरी करते. तिच्या सात सीटर क्षमतेमुळे मोठ्या कुटुंबांसाठी तसेच व्यावसायिक वापरासाठी ही कार अत्यंत उपयुक्त आहे.
डिझेल इंजिन असल्यामुळे मायलेजही समाधानकारक मिळते आणि दीर्घकालीन वापरासाठी देखभाल खर्च तुलनेने कमी असतो. त्यामुळे जर तुम्ही किफायतशीर, मजबूत आणि विश्वासार्ह एसयूव्हीच्या शोधात असाल तर महिंद्रा बोलेरो ही निश्चितच एक उत्तम निवड ठरू शकते.
जर तुम्हालाही महिंद्रा बोलेरो EMI वर घ्यायची असेल तर योग्य फायनान्स प्लॅन निवडून तुमची स्वप्नातील एसयूव्ही सहज घरी आणू शकता