आली रे आली महिंद्राची इलेक्ट्रिक कार आली! Mahindra BE6 EV लॉन्च… भन्नाट आहे किंमत आणि फीचर्स

महिंद्रा BE6 ही महिंद्राच्या Born Electric पोर्टफोलिओतील अत्याधुनिक इलेक्ट्रिक SUV आहे.जी भारतात नव्या तंत्रज्ञानासह सादर करण्यात आली आहे. या गाडीचा बेस व्हेरिएंट "पॅक वन" म्हणून ओळखला जातो आणि त्यात अनेक प्रीमियम फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Mahindra Electric Car:- महिंद्रा BE6 ही महिंद्राच्या Born Electric पोर्टफोलिओतील अत्याधुनिक इलेक्ट्रिक SUV आहे.जी भारतात नव्या तंत्रज्ञानासह सादर करण्यात आली आहे. या गाडीचा बेस व्हेरिएंट “पॅक वन” म्हणून ओळखला जातो आणि त्यात अनेक प्रीमियम फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. BE6 च्या लाँचिंगनंतर इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. कारण या गाडीत दीर्घ बॅटरी रेंज, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.

Mahindra BE6 बॅटरी पॅक

महिंद्रा BE6 पॅक वन व्हेरिएंटमध्ये 59 kWh क्षमतेची दमदार लिथियम-आयन बॅटरी दिली असून, ती पूर्ण चार्ज केल्यानंतर 557 किमी पर्यंत रेंज देऊ शकते. यामुळे ही SUV लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच यात दिलेला 170 kW (228 BHP) पॉवर आणि 380 Nm टॉर्क निर्माण करणारा इलेक्ट्रिक मोटर गाडीला उत्कृष्ट वेग आणि परफॉर्मन्स देतो.

या गाडीत पाच वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये रेंज मोड, एव्हरीडे मोड, रेस मोड, स्नो मोड आणि कस्टम मोड यांचा समावेश आहे. या मोड्समुळे विविध परिस्थितींमध्ये SUV उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.

Mahindra BE6 डिझाईन

BE6 ची डिझाइन आणि परिमाणही प्रभावी आहेत. ही गाडी 4,371 मिमी लांब, 1,907 मिमी रुंद आणि 1,627 मिमी उंच असून तिचा व्हीलबेस 2,775 मिमी इतका आहे. 207 मिमी ग्राउंड क्लीयरन्समुळे ती खराब रस्त्यांवर सहजगत्या चालवता येते. SUV मध्ये 455 लिटरचा बूट स्पेस आणि 45 लिटरचा फ्रंक स्पेस उपलब्ध आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान ठेवणे शक्य होते.

गाडीच्या बाह्य आणि अंतर्गत भागात अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेललॅम्प्स, ओआरव्हीएम टर्न इंडिकेटर आणि स्टायलिश रिअर स्पॉयलर देण्यात आला आहे. 18-इंच स्टील व्हील्स गाडीला एक आकर्षक लुक देतात.

गाडीच्या इंटिरियरमध्ये 12.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3-इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आहे. जो अलेक्सा आणि ChatGPT सह इंटिग्रेटेड आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टमुळे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सोपी होते. याशिवाय ड्रायव्हिंग अॅनालिटिक्स, कनेक्टेड कार फीचर्स आणि OTA अपडेट्स यांसारखी वैशिष्ट्येही उपलब्ध आहेत.

Mahindra BE6 सेफ्टी फीचर्स

सुरक्षेच्या दृष्टीने BE6 SUV मध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यात सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, रिअर पार्किंग सेन्सर, रिव्हर्स कॅमेरा, ABS आणि EBD यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच हिल होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये गाडीला अधिक स्थिर बनवतात.

Mahindra BE6 किंमत

महिंद्रा BE6 च्या पॅक वन व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे. या गाडीचे बुकिंग 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.तर डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत असताना BE6 एक दमदार पर्याय ठरणार आहे.

कारण ती आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट बॅटरी रेंज आणि प्रगत सुरक्षाविषयक फीचर्ससह येते. जर तुम्हाला दीर्घ रेंज आणि उच्च कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक SUV हवी असेल तर BE6 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe