Mahindra Scorpio 2025 : नवीन एसयूव्ही खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. Mahindra स्कॉर्पिओ ही कंपनीची एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. या गाडीची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतील.
दरम्यान जर तुम्हालाही येत्या दिवाळीत ही गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा दमदार लुक आणि परफॉर्मन्स तरुणांना विशेष आकर्षित करत आहे.

ही गाडी शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडे जोरात विकली जाते. ही गाडी तरुणांची सर्वाधिक आवडती गाडी बनली आहे. यामुळे या गाडीचा सेल पण फारच चांगला आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत येते.
दरम्यान जर तुम्हाला ही महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक गाडी खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहोत. या गाडीच्या खरेदीसाठी तुम्ही चार लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास तुम्हाला काय हप्ता पडेल याबाबत आज आपण डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या लोकप्रिय एसयूव्हीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.98 लाख रुपये आहे. ही गाडी एकूण चार व्हेरिएंटमध्ये येते. याच्या बेस मॉडेलची किंमत 12.98 लाख रुपये एक्स शोरूम आहे. याचे सर्व व्हेरिएंट हे डिझेलमध्ये आहेत.
कितीचा EMI भरावा लागेल ?
दिल्लीत याच्या बेस मॉडेलची किंमत बारा लाख 97 हजार 701 रुपये (एक्स शोरूम) आहे. पण, ऑन रोड प्राईस 15 लाख 52 हजार 155 रुपये आहे. आता ही गाडी खरेदी करण्यासाठी तुम्ही चार लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला 11 लाख 52 हजार 155 रुपये फायनान्स करावे लागणार आहे.
बँका वाहन कर्ज साधारणता नऊ – दहा टक्के व्याजदरात उपलब्ध करून देतात. आता जर तुम्हाला दहा टक्के व्याजदरात सात वर्षांसाठी स्कॉर्पिओ घेण्यासाठी कर्ज उपलब्ध झाले तर तुम्हाला 19,127 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. अर्थात स्कॉर्पिओ खरेदीसाठी चार लाख 54 हजार 525 रुपये व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.