Mahindra Scorpio Classic लाँच…किंमत 11 लाखांपासून सुरु…

Mahindra Scorpio(7)

Mahindra Scorpio Classic च्या किमती जाहीर झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, Scorpio Classic दोन प्रकारात S आणि S11 सादर करण्यात आली आहे. Mahindra Scorpio Classic S ची किंमत 11.99 लाख रुपये आणि S11 ची किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

स्कॉर्पिओ क्लासिक भारतात 14 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आली होती, कंपनीने 20 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज किंमती जाहीर केल्या आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल ज्यात रेड रे, नेपोली बॅक, डीसॅट सिल्व्हर, पर्ल व्हाइट आणि नवीन गॅलेक्सी ग्रे यांचा समावेश आहे.

जुन्या पिढीच्या वाहनाच्या तुलनेत, नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकला डिझाइन आणि यांत्रिक अपडेट मिळतात. स्कॉर्पिओ क्लासिक नवीन महिंद्रा लोगोसह येते. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे अनोखे डिझाईन कायम ठेवत, त्यात अद्ययावत फ्रंट ग्रिल, पुन्हा डिझाइन केलेले बोनेट आणि ट्विक केलेले बंपर मिळतात.

Mahindra Scorpio(6)

महिंद्राचा दावा आहे की नवीन इंजिन मागील मॉडेलपेक्षा 55 किलो हलके आणि 14 टक्के जास्त इंधन कार्यक्षम आहे. Scorpio Classic दुसऱ्या पिढीतील mHawk इंजिनद्वारे समर्थित आहे जे 130 Bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

महिंद्राने MTV-CL तंत्रज्ञानासह सस्पेन्शन सेटअप सुधारित केले आहे आणि उत्तम राइड आणि हाताळणी देण्यासाठी स्टीयरिंग सिस्टममध्ये सुधारणा केली आहे. एकंदरीत, हलक्या इंजिनसह, 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक जुन्या मॉडेलपेक्षा उत्तम ड्राइव्ह कामगिरी देईल.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 Scorpio Classic ला LED हेडलाइट्स, LED DRLs आणि फॉग लॅम्प्स मिळतात. यात 17-इंच अलॉय व्हील आहेत. SUV मध्ये फोन मिररिंग आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, दोन-टोन बेज-आणि-काळ्या इंटीरियर, डॅशवर वुड इन्सर्ट आणि आरामदायी सीट आहेत.

Mahindra Scorpio(5)

सुरक्षिततेसाठी, स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप, EBD सह ABS, दोन फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल आहे. ग्राहकांना निवडक महिंद्रा डीलरशिपवर नवीन स्कॉर्पिओ क्लासिकची चाचणी ड्राइव्ह देखील दिली जात आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा आपले स्कॉर्पिओ क्लासिक मॉडेल केवळ भारतातच नव्हे तर भूतान, नेपाळ, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये विकण्याची योजना आखत आहे आणि अशा देशांमध्ये महिंद्राचे स्कॉर्पिओ क्लासिक मॉडेल भारतातूनच निर्यात केले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe