Mahindra Thar Earth Edition:- दिवाळी सणाचा कालावधी म्हटला म्हणजे अनेक नवनवीन गोष्टी सुरू करण्याचा किंवा एखाद्या व्यवसायाला सुरुवात करण्याचा शुभमुहूर्ताचा कालावधी समजला जातो. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी देखील खरेदी केल्या जातात.
त्याचप्रमाणे वाहन खरेदी देखील खूप मोठ्या प्रमाणावर या कालावधीत होत असते. वाहन खरेदीमध्ये कार तसेच बाईक्स, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांची खरेदी केली जाते. विशेष म्हणजे अशा सणासुदीच्या कालावधीमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात.

या सगळ्या सवलतीचा नक्कीच ग्राहकांना फायदा होत असतो. याच सवलतीच्या अनुषंगाने जर आपण बघितले तर सर्वांची आवडती असलेली महिंद्रा थार तीन डोअर अर्थ एडिशनवर देखील आता मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात असून ग्राहकांनी जर ही कार खरेदी केली तर तब्बल 3.50 लाख रुपये पर्यंत बचत करता येणे शक्य होणार आहे.
महिंद्रा थार 3 डोअर अर्थ एडिशनवर मिळत आहे भरघोस सूट
आपल्याला माहित आहे की महिंद्राची नवीन थार रॉक्स एसयुव्हिने जेव्हा बाजारामध्ये एन्ट्री केली होती तेव्हाच सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता कंपनीने अर्थ एडिशन तीन डोअर थार एसयुव्ही वर बंपर सूट दिली आहे.
जर आपण या कारची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती साधारणपणे 15 लाख 40 हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु तुम्ही यावेळी जर ही कार खरेदी केली तर त्यावर तब्बल तीन लाख 50 हजार रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकतात.
तसेच महिंद्रा थार अर्थ एडिशनच्या टॉप मॉडेलची किंमत 17 लाख 60 हजार रुपये पर्यंत जाते. महिंद्रा कंपनीची स्पेशल एडिशन चार व्हील ड्राईव्ह मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. थारच्या अर्थ एडिशनला एक खास मॅट शेड देण्यात आले आहे व ज्याला कंपनीने डेझर्ट फ्युरी असे नाव दिले असून याशिवाय बी पिलर आणि रिअर फेंडर्सवर अर्थ एडिशन बॅज देखील दिले आहे.
कसे आहे इंजिन?
थारमध्ये 2.0 लिटर पेट्रोल आणि 2.2- लिटर डिझेल इंजिन पर्याय दिले असून 4 व्हील ड्राईव्ह सह ऑफर केली जाते. दोन्ही इंजिन पर्याय हे सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सशी जोडलेले आहे.
इतर वैशिष्ट्ये
महिंद्रा थार अर्थ एडिशनमध्ये लेदररेट अपहोलस्ट्री देण्यात आले असून ज्याला काळ्या बेज रंगाचे ड्युअल टोन फिनिश दिले आहे. स्पेशल एडिशन मध्ये स्टिअरिंग व्हील वरील महिंद्राचा लोगो, कफ होल्डर्स, गिअर नॉब आणि गिअर कन्सोलमध्ये डार्क क्रोम फिनिश आहे. थार अर्थ एडिशन आतून आणि बाहेरून प्रमाणित मॉडेल पेक्षा खूपच आकर्षक दिसते.
दोन व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध आहे
महिंद्रा कंपनीने ही कार दोन इंजिन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली असून यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय देण्यात आलेले आहेत. पेट्रोल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 15 लाख 40 हजार रुपये तर ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 16 लाख 99 हजार रुपये आहे. तसेच डिझेल व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 16 लाख 15 हजार ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 17 लाख 60 हजार रुपये आहे.