महिंद्रा नवीन वर्षात लॉन्च करणार 9 सीटर MPV कार ! थारसारखा लूक मिळणार, मोठ्या फॅमिलीसाठी फायदेशीर राहणार

Mahindra 9 Seater Car : भारतात आजही संयुक्त परिवाराची संस्कृती आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात अव्वल आहे. देशात एकत्रित कुटुंबात राहणारे लोक नेहमीच 7 सीटर किंवा 9 सीटर कार घेण्याला विशेष पसंती दाखवत असतात. विशेष म्हणजे देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी भारतीय बाजारात सेवन सीटर कार लॉन्च केल्या आहेत.

अशातच आता आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये महिंद्रा कंपनी देखील भारतीय बाजारात 9 सीटर कार लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही देशातील एक प्रमुख कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार बाजारात विशेष लोकप्रिय आहेत.

ग्राहकांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गाड्यांची विशेष क्रेज आहे. या कंपनीची बोलेरो SUV देखील विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. ग्रामीण भागांमध्ये या गाडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. ग्रामीण भागात या गाडीचा एक मोठा चाहता वर्ग तुम्हाला पाहायला मिळेल.

दरम्यान या गाडीची लोकप्रियता पाहता आता कंपनीने ही गाडी 9 सीटर मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र ही 9 सीटर बोलेरो SUV केव्हा लॉन्च होणार याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि आज आपण या गाडीच्या संभाव्य फीचर्स बाबत आणि वैशिष्ट्यांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मीडिया रिपोर्ट नुसार, महिंद्रा कंपनी लवकरच त्यांची एक लोकप्रिय गाडीची अपग्रेडेड आवृत्ती लॉन्च करणार आहे. कंपनी Mahindra Boloro Neo ची अपग्रेडेड आवृत्ती Boloro Neo Plus लाँच करणार अशी माहिती समोर आली आहे. सध्याच्या बोलेरो निओ या गाडीला ग्राहकांनी विशेष प्रेम दाखवले आहे. ही गाडी कंपनीची एक हॉट सेलिंग कार आहे. यामुळे या गाडीची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून Boloro Neo Plus SUV लाँच होणार आहे.

ही कार 9 सीटर एसयूव्ही राहणार आहे. या अपग्रेडेड कार मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केलेले राहणार आहेत. या नव्याने बाजारात दाखल होणाऱ्या 9 सीटर कारमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग, एअर कंडिशनिंग, ड्युअल एअरबॅग्ज आणि 16 इंच अलॉय व्हील दिले जाणार आहेत.

या गाडीत पावरफुल डिझेल इंजिन दिले जाणार आहे आणि सहा गिअर राहणार आहेत. स्कॉर्पिओ एन मध्ये जे इंजिन असेल तेच इंजिन या गाडीत दिले जाईल असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या नव्याने लॉन्च होणाऱ्या एसयूव्हीची किंमत ही जवळपास 10 लाखांच्या आसपास असू शकते असे सांगितले जात आहे.