Mahindra XUV 3XO : महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही दिग्गज कंपनी दरवर्षी नवनवीन कार लाँच करत असते. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यातही महिंद्रा कंपनीची Mahindra Thar Roxx ही बहुचर्चित एसयूव्ही कार लॉन्च होणार आहे. ही 5 दरवाजा असणारी आगामी SUV कार 3 Door Thar चे अपडेटेड वर्जन राहणार आहे.
दरम्यान आज आपण Mahindra कंपनीने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लॉन्च केलेल्या XUV 3XO या कारबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर ही कंपनीची एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. ही कार लॉन्च झाल्यापासून चर्चेत आहे.
या गाडीची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली आहे. आपल्यापैकी अनेकजण ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना अनेकांनी ही गाडी खरेदी केलेली असेल. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग या गाडीची क्रेझ पाहायला मिळतं आहे.
यामुळे या गाडीबाबत जाणून घेण्याची ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह येते. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून या गाडीच्या मायलेज बाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.
अशातच या गाडीची मायलेज चाचणी समोर आली आहे. या SUV च्या 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मॉडेलच्या नुकतीच मायलेज चाचणी करण्यात आली आहे.
यामुळे जर तुम्हाला हे मॉडेल खरेदी करायचे असेल तर ही गाडी किती मायलेज देते हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. खरेतर, Mahindra XUV 3XO च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने ही SUV 18.20kmpl ची मायलेज देत असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात ही गाडी किती मायलेज देते हे आज आपण जाणून घेऊया.
शहरात मायलेज किती ?
महिंद्रा कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली XUV 3XO ही SUV शहरात हायवे च्या तुलनेत कमी मायलेज देते. ही कार 9.6kmpl एवढे मायलेज देते. मात्र ही गाडी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले वर अधिक मायलेज दाखवते. या डिस्प्ले वर 10.2 केएमपीएल एवढे मायलेज दाखवले जात होते.
हायवेवर किती मायलेज देते ?
Mahindra XUV 3XO ही हायवेवर कंपनीने सांगितल्याप्रमाणे चांगले मायलेज देते. हायवेवर ही कार 18.08kmpl मायलेज देते. विशेष म्हणजे हायवेवर गाडी चालवताना मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर सुद्धा 18.9kmpl एवढे मायलेज दाखवले जात होते.
एकंदरीत शहरात आणि हायवेवर गाडी चालवल्यास ही गाडी सरासरी 11.7kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. ही गाडी जर एकदा फुल केली तर जवळपास 492 किलोमीटर पर्यंत चालते. या गाडीचा फ्युल टॅंक हा 42 लिटर एवढा आहे.