Mahindra XUV 400 : ग्रँडमास्टर रमेशबाबु प्रज्ञानंदने बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या कामगिरीने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. नुकतीच त्याने जगातील नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या सामन्यात चांगली लढत दिली. बुद्धिबळ विश्वचषकात 18 वर्षाच्या प्रज्ञानंदने 32 वर्षांच्या कार्लसनला दिलेल्या जबरदस्त आव्हानामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अशातच महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील त्याच्या कामगिरीमुळे प्रभावित झाले आहे. त्यांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबाला आलिशान कार भेट देण्याचा मोठा निर्णय घेतला. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले की ते तरुण भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देणार आहे. नुकत्याच झालेल्या FIDE बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेतेपद पटकावल्यानंतर अनेकजण आता महिंद्रा यांना प्रग्नंधाला थार एसयूव्ही देण्याची विनंती करू लागले आहेत.

Appreciate your sentiment, Krishlay, & many, like you, have been urging me to gift a Thar to @rpragchess
But I have another idea …
I would like to encourage parents to introduce their children to Chess & support them as they pursue this cerebral game (despite the surge in… https://t.co/oYeDeRNhyh pic.twitter.com/IlFIcqJIjm— anand mahindra (@anandmahindra) August 28, 2023
त्यामुळे एका पोस्टला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी असे लिहिले आहे की, “कृशल्या, मी तुझ्या भावनांची कदर करतो. तुझ्याप्रमाणेच अनेकजण मला प्रज्ञानंदला थार भेट देण्याचा आग्रह करत आहेत. परंतु माझ्याकडे दुसरा उपाय आहे.”
“मी पालकांना त्यांच्या मुलांना बुद्धिबळात दाखविण्यासाठी आणि माइंड गेमर्सना समर्थन देण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. EVs प्रमाणे, ही चांगल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे ”
“त्यामुळे म्हणूनच, मला असे वाटत आहे की, आपल्या मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्याला अथक पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आपण प्रगनंधाचे आई-वडील, श्रीमती नागलक्ष्मी आणि श्री रमेशबाबू यांना XUV400 EV भेट द्यावी, असे त्यांनी पुढे लिहिले.
यामध्ये महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ राजेश जेजुरीकर यांना पोस्टमध्ये टॅग करत त्यावर त्यांचे मत विचारले आहे. यावर जेजुरीकरांनी लिहिले की, “अद्भुत कामगिरीबद्दल प्रग्नंदाचे अभिनंदन! प्रज्ञानंदच्या आई-वडिलांना मान्यता देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आनंदाचे खूप खूप आभार!”
“ऑल-इलेक्ट्रिक SUV XUV400 परिपूर्ण असणार आहे- आमची टीम विशेष आवृत्त्या आणि वितरणासाठी लवकरच संपर्कात असणार आहे.” असे त्यांनी पुढे लिहिले. प्रोत्साहन दिल्याबद्दल आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात येत आहे.
Mahindra XUV400 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV असून तिची हे 15.99 लाख ते 18.99 लाख रुपयांच्या किंमतीत विक्री होत आहे. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV 34.5 kWh आणि 39.4 kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये आणली आहे.
जी 150 एचपी पॉवर आणि 310 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. लहान बॅटरीसह, ही कार 375 किमीची रेंज देईल तसेच मोठ्या बॅटरीसह, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 456 किमीची रेंज देईल.