Mahindra XUV400: बाजारात आली महिंद्राची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक कार ! देणार Tata Nexon EV ला टक्कर ; जाणून घ्या किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra XUV400: भारतीय बाजारपेठेमध्ये आज एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार लाँच होताना दिसत आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ पाहता आज अनेक ऑटो कंपन्या कमी किमतीमध्ये जास्त रेंजसह येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात लाँच करत आहे.

यातच तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये महिंद्र ऑटोने तिची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ज्याची आता डिलिव्हरी सुरू झाली आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या काही दिवसापूर्वी कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार  Mahindra XUV400 लाँच केली होती ज्याची आता कंपनीने  डिलिव्हरी सुरू केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात  Mahindra XUV400 टाटाची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV ला टक्कर देणार आहे. सध्या इलेक्ट्रिक कार्स सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक Tata Nexon EV आहे.

Mahindra XUV400

आम्ही तुम्हाला सांगतो की Mahindra XUV400 च्या बॅटरी पॅकमध्ये – 34.5 kWh आणि 39.4 kWh पर्याय आहेत. कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ 8.3 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास वेग घेऊ शकते. कंपनीची ही कार एका चार्जमध्ये 456 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तथापि, त्याचा छोटा बॅटरी पॅक एका चार्जवर 375 किलोमीटर अंतर कापेल. आम्ही तुम्हाला सांगतो Mahindra XUV400 फास्ट चार्जरने 50 मिनिटांत चार्ज करता येते.

Mahindra XUV400 किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 15.99 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 18.99 लाख रुपये खर्च करावे लागतील.

म्हणूनच जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्राची ही जबरदस्त कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. यासोबतच त्याचा लुकही अतिशय स्टायलिश देण्यात आला आहे जो देशातील तरुणांना खूप आवडू शकतो.

XUV400 Vs Nexon EV Which EV is Best for You Know Everything in One Click
 

हे पण वाचा :- Business Idea 2023: दरमहा होणार बंपर कमाई ! घरी बसून सुरू करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ; जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe