Maruti Alto K10:- मारुती अल्टो K10 जी सामान्य माणसाची परवडणारी आणि लोकप्रिय गाडी म्हणून ओळखली जात होती. आता खूप महाग झाली आहे. काही वर्षांपूर्वी कारच्या किमती फक्त वर्षातून एकदाच वाढायच्या. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कार कंपन्या दरमहा कारच्या किमतीत वाढ करत आहेत.
यामागचे कारण म्हणजे वाढती उत्पादन खर्च तसेच इनपुट खर्च ज्यांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. मारुती सुझुकीने त्याच्या कारांच्या किमतीत 4% वाढ केली होती आणि आता फेब्रुवारी महिन्यातही त्यांनी पुन्हा एकदा किमती वाढवल्या आहेत.
![maruti alto k10](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/maruti.jpg)
मारुती अल्टो के 10 च्या किमतीत वाढ
अल्टो के१०ची किंमत आता 19500 रुपयांनी वाढली आहे. ज्यामुळे ती अधिक महाग झाली आहे. ही वाढ विशेषतः तिच्या टॉप व्हेरिएंट VXI Plus (O) मध्ये करण्यात आली आहे.
ज्यामुळे आता गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये झाली आहे. याचवेळी बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4.09 लाख रुपये झाली आहे. यामुळे आता ही गाडी खरेदी करण्यास काही विशेष कारण नाही.
कारण या किमतीत तुम्ही थोडे जास्त पैसे गुंतवून मारुती सुझुकीच्या इतर मॉडेल्स जसे की, सेलेरियो, वॅगन आर किंवा अगदी स्विफ्ट देखील खरेदी करू शकता. त्यामुळे अल्टो के१०ची किमत आणि त्याच्या उपलब्ध पर्यायांच्या तुलनेत ती काहीशी आकर्षक दिसत नाही.
किंमत वाढीनंतर करण्यात आले आहेत का काही बदल?
तसेच अल्टो के10ने तिचे मूळ डिझाइन गमावले आहे आणि आता ती काहीशी आकर्षक वाटत नाही. तिचे बाह्य रूप आधीप्रमाणे आकर्षक किंवा प्रगल्भ नाही आणि काही लोकांसाठी ती आता सर्वात वाईट दिसणारी छोटी कार होऊन गेली आहे.
मारुती अल्टो के 10 चे प्लस पॉईंट
तथापि गाडीचे इंजिन आणि सुरक्षा वैशिष्ट्ये चांगली आहेत. अल्टो के10मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे.ज्यामुळे ती चांगली मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये या गाडीला 33.85 किमी प्रति किलो मायलेज मिळते.ज्यामुळे ती पर्यावरणानुसार आणि खर्चाच्या दृष्टीने आकर्षक ठरू शकते. कारची राइड गुणवत्ता आणि हाताळणी देखील चांगली आहे.
ज्यामुळे लहान कुटुंबांसाठी ती एक आरामदायक गाडी ठरते. सुरक्षा बाबतीत, अल्टो के10 मध्ये EBD आणि एअरबॅग्जसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आहे. जे वाहनाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे.तरीही अल्टो के10 च्या वाढलेल्या किमतीमुळे ती आता कदाचित काही कुटुंबांसाठी जास्त खर्चिक ठरू शकते आणि त्याऐवजी अन्य अधिक आकर्षक आणि प्रगल्भ पर्यायांचा विचार करणे हे चांगले ठरेल.