Maruti Car Offer : स्वस्तात कार खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण! 1 लाखात ‘या’ ठिकाणाहून खरेदी करा मारुतीची सर्वात लोकप्रिय कार

Published on -

Maruti Car Offer : भारतीय बाजारात मारुतीच्या अनेक कार्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कंपनीही आपल्या कार्स लाँच करत असते. परंतु कंपनीने आपल्या सर्वच कारच्या किमतीत वाढ केली आहे. आता तुम्ही मारुतीची सर्वात लोकप्रिय कार 1 लाखात खरेदी करू शकता.

हीच कार तुम्ही खरेदी करण्यासाठी एखाद्या शोरूममध्ये गेला तर तुम्हाला त्यासाठी एकूण 6.51 लाख ते 9.39 लाख रुपये मोजावे लागतील. परंतु आता तुम्ही अवघ्या एक लाख रुपयात कार खरेदी करू शकता. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर.

आता तुम्ही शोरूममधून मारुती डिझायर खरेदी केली तर तुमचे 6.51 लाख ते 9.39 लाख रुपये इतके बजेट असावे. परंतु जर तुम्हाला ही सेडान आवडली असेल, परंतु ती खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे तर तुम्ही सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता. ज्याद्वारे तुम्ही ही सेडान निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.विविध ऑनलाइन वेबसाइट्सवर सध्या ऑफर्स उपलब्ध आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मारुती डिझायर सेकंड हँड मॉडेलवर पहिली ऑफर QUIKR वेबसाइटवर मिळत आहे. या ठिकाणी हरियाणा नंबर प्लेट असणारे डिझायरचे 2014 मॉडेल अपलोड केले आहे. जर किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 3.5 लाख रुपये ठेवली आहे, परंतु हे लक्षात घ्या की या कारच्या खरेदीवर विक्रेत्याकडून कोणताही फायनान्स प्लॅन दिला जात नाही.

मारुती डिझायर वर दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे. या ठिकाणी दिल्ली क्रमांकासह Dezire चे 2012 मॉडेल सूचीबद्ध करण्यात आले आहे, ज्याची किंमत विक्रेत्याने 1.10 लाख रुपये इतकी ठेवली आहे. परंतु ही सेडान खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून कोणतीही फायनान्स प्लॅन सुविधा देण्यात येत नाही.

मारुती डिझायरची सगळ्यात शेवटची आणि तिसरी स्वस्त डील DROOM वेबसाइटवर अपलोड केली आहे. या ठिकाणी 2013 चे दिल्ली नोंदणी असणारे मॉडेल विक्रीसाठी ठेवले आहे. येथे या सेडानची किंमत 2.05 लाख रुपये ठेवली आहे. ती खरेदी केल्यानंतर ग्राहकांना सुलभ डाउन पेमेंटसह फायनान्स प्लॅन मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe