Maruti celerio Upgrade:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात हॅचबॅक कार्सची मागणी कायम वाढत आहे आणि मारुती सुझुकीची सेलेरियो ही कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स देणारी कार म्हणून लोकप्रिय ठरली आहे. आता ही कार आधीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे.कारण मारुतीने या हॅचबॅकमध्ये आता ६ एअरबॅग्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे सेलेरियो अधिक सुरक्षित पर्याय बनली असून संपूर्ण लाइनअपमध्ये हे नवीन सेफ्टी फीचर उपलब्ध असेल.
६ एअरबॅग्जसह सेलेरियो अधिक सुरक्षित

मारुतीने आपल्या २०२५ च्या ब्रोशरमध्ये मोठा बदल करत सर्व प्रकारांमध्ये ६ एअरबॅग्ज समाविष्ट केल्या आहेत. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्जसह साइड आणि कर्टन एअरबॅग्जचा समावेश आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व सीट्ससाठी तीन-पॉइंट सीट बेल्टही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कारमधील सेफ्टी स्टँडर्ड्स अधिक उंचावले गेले आहेत.
सेलेरियोची फीचर्स
नवीन सेलेरियोमध्ये फक्त सुरक्षा नव्हे तर अनेक उत्तम फीचर्सही देण्यात आले आहेत. बेस व्हेरियंटपासूनच बॉडी-कलर बंपर, क्रोम अॅक्सेंटसह फ्रंट ग्रिल, फ्रंट केबिन लॅम्प, सिक्स बॉटल होल्डर्स, मॅन्युअल एसी,
पॉवर स्टीअरिंग आणि गियर शिफ्ट इंडिकेटर यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ABS, EBD, ESP, हेडलाइट लेव्हलिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, स्पीड अलर्ट सिस्टम आणि चाइल्ड प्रूफ रियर डोअर लॉक यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्येही यात आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्स
मारुती सेलेरियोमध्ये ९९८ सीसी क्षमतेचे K10C इंजिन देण्यात आले आहे.जे ५०.४ किलोवॅट पॉवर आणि ९१.१ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. त्यामुळे इंधन बचतीच्या दृष्टीनेही ती एक चांगला पर्याय ठरू शकते.
मारुती सेलेरियोची किंमत
सेलेरियोची किंमत ५.६४ लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम, बेस व्हेरियंट LXI MT). तर टॉप व्हेरियंटसाठी ही किंमत ७.३७ लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमतीमुळे सेलेरियो ही बजेट फ्रेंडली हॅचबॅक म्हणून अजूनही आकर्षक पर्याय ठरते.
सेलेरियोची स्पर्धा कुणाशी?
भारतीय बाजारात हॅचबॅक सेगमेंटमध्ये सेलेरियोची स्पर्धा मारुतीच्या वॅगन आर, एस-प्रेसो, तसेच रेनॉल्ट क्विड आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओस यांसारख्या लोकप्रिय कार्ससोबत आहे. अधिक सुरक्षितता आणि उत्तम मायलेज यामुळे ती ग्राहकांसाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते.
मारुती सेलेरिओ ग्राहकांना फायद्याची
नवीन ६ एअरबॅग्जसह अपडेट झालेली मारुती सेलेरियो आता अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय ठरते. किंमत, मायलेज आणि फीचर्स लक्षात घेतल्यास भारतीय ग्राहकांसाठी ही एक किफायतशीर आणि सुरक्षित हॅचबॅक ठरू शकते.