Maruti Ertiga GST : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहील. खरे तर आता गाड्यांच्या किमती खूपच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हजारो रुपये वाचतील. केंद्रातील मोदी सरकारने वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील अंतिम निर्णय झालाय. या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द झालेत. या निर्णयामुळे अनेक वस्तूच्या किमती कमी होणार आहेत.

350 सीसी पेक्षा कमी इंजिन असणाऱ्या मोटरसायकलचा जीएसटी कमी करण्यात आला आहे. चार मीटर पेक्षा कमी लांबी व 1200 सीसी पेक्षा कमी इंजिन असणाऱ्या कार्सचा जीएसटी सुद्धा कमी झाला आहे.
दरम्यान जीएसटी कपातीचा निर्णय झाल्यानंतर मारुती सुझुकी एर्टिगाची किंमत किती कमी होईल ? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रत्येकजण मारुती सुझुकीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे.
पण नवीन जीएसटी चे रेट 22 सप्टेंबर पासून लागू होतील यामुळे वाहनांच्या किमती कितीने कमी होणार हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तरीही आज आपण मारुती एर्टिगाची किंमत कितीने कमी होऊ शकते याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.
किती कमी होणार किंमत ?
एर्टिगाची लांबी 4 मीटरहुन जास्त आहे. तसेच गाडीला 1.5 लिटर इंजिन आहे. यामुळे या कॉम्पॅक्ट एमपीव्हीवर आधीप्रमाणे 40 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. पण यावर लागणारा सेस मात्र रद्द होणार आहे. 22 सप्टेंबरला नवीन जीएसटी रेट लागू होतील. त्यावेळी एर्टिगाची किंमत 46 हजार 200 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.
LXI (O) वॅरियंटची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 11 हजार 500 रुपये आहे. ही किंमत 31 हजार 400 रुपयांनी कमी होऊ शकते.
VXI (O) वॅरियंट एक्स-शोरूम किंमत 10 लाख 20 हजार 500 रुपये आहे. ही किंमत 35 हजार 100 रुपयांनी कमी केली जाऊ शकते.
ZXI (O) वॅरियंटची एक्स शोरूम किंमत 11 लाख 30 हजार 500 आहे. पण ही किंमत 38 हजार 900 रुपयांनी कमी होऊ शकते.
ZXI प्लस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12 लाख 500 रुपये आहे. पण ही किंमत 41,300 रुपयांनी कमी होऊ शकते.
विशेष म्हणजे सीएनजी वॅरियंटच्या किमती सुद्धा 42 हजार दोनशे रुपयांनी कमी होणार असा अंदाज आहे. तसेच या गाडीच्या टॉप मॉडेल ऑटोमॅटिक वॅरियंटची किमत 46,200 रुपयांनी कमी होणार आहे.