Maruti Escudo लॉन्च होणार ! फक्त 10 लाखांत हायब्रिड आणि बजेटचा परफेक्ट कॉम्बो ! Creta आणि Seltos ला टक्कर…

क्रेटा, सेल्टोसला टक्कर देणारी दमदार स्पर्धक SUV एस्कुडोची लांबी आणि डिझाईन बघता ती मारुती सुझुकीची ही कार ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्या सेगमेंट मधील असेल त्यामुळे SUV घेऊ इच्छिणाऱ्या मध्यम बजेटच्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. मारुतीचा विश्वासार्ह ब्रँड आणि सुधारित हायब्रिड टेक्नोलॉजीसह एस्कुडो भारतीय SUV चाहत्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण करू शकते.

Published on -

Maruti Escudo : मारुती सुझुकीने आपली ओळख भारतात स्वस्त, टिकाऊ आणि विश्वासार्ह कार निर्माता म्हणून पक्की केली आहे. आता हीच कंपनी आपल्या SUV पोर्टफोलिओला आणखी बळकटी देण्यासाठी  नवीन दमदार SUV घेऊन येत आहे. यावेळी मात्र मारुतीचं लक्ष फक्त आकारावर नाही, तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावरही असेल कारण भविष्यातील गाडी म्हणजे केवळ लुक नव्हे, तर स्मार्ट इंजिनही हवेच

सध्या कंपनी जी SUV आणत आहे, ती एक फाईव्ह सीटर कार असणार आहे. ती आकाराने थोडी मोठी असली तरीही ग्रँड विटाराच्या किंमती पेक्षा जरा कमी असेल. म्हणजेच, ज्या ग्राहकांना आकर्षक SUV हवी पण बजेट जास्त नाही, त्यांच्यासाठी ही एक मस्त पर्याय ठरणार आहे. ही गाडी Nexa शोरूममधून नाही तर Arena द्वारे विकली जाईल, कारण तिचं स्थान थोडं ‘मिड-सेगमेंट’मध्ये असेल.

ही SUV ब्रेझापेक्षा मोठी आणि ग्रँड विटारापेक्षा किंचित लहान असून, पाच जण बसू शकतील अशी आरामदायक जागा देणारी असेल. मारुतीने यामध्ये शहरातील वापर आणि थोड्याफार लांब पल्ल्याच्या ट्रिप्स दोन्ही लक्षात घेऊन डिझाईन केलेलं हे मॉडेल मध्यम आकाराच्या SUV बाजारपेठेत दाखल होईल.

इंजिनबद्दल बोलायचं झालं, तर ही SUV माइल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड इंजिनसह येऊ शकते, अगदी ग्रँड विटारासारखीच. म्हणजेच, पेट्रोलवर चालणारी पण इंधन वाचवणारी! कंपनीने नाव अजून अधिकृतपणे घोषित केलेलं नाही, पण ‘एस्कुडो’ हे नाव चर्चेत आहे.

किंमतीचा विचार करता, ही SUV अंदाजे १० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. चाचणीदरम्यान ही गाडी अनेक वेळा रस्त्यांवर स्पॉट झाली आहे, आणि तिच्या लुकवरून हे लक्षात येतं की डिझाईनच्या बाबतीत मारुतीने यावेळी खूप विचारपूर्वक काम केलं आहे. गाडीचा इंटीरियरही काहीसा ग्रँड विटारा आणि ब्रेझासारखाच असेल म्हणजेच, तुम्हाला स्वस्त गाडीमध्येही प्रीमियम फील मिळेल.

इंटेरिअर बद्दल बोलायचं झालं तर ९ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ६ एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसारखी सुरक्षा यंत्रणा, हे सगळं यात असेल. शिवाय, सीएनजी पर्यायही मिळू शकतो, जे आजच्या इंधनदरांच्या काळात खूप उपयोगी ठरणार आहे. मारुती सुझुकी आता “स्वस्त आणि मस्त” या प्रतिमेपलीकडे जाऊन “स्मार्ट आणि टिकाऊ” पर्याय उभारण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!