भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही SUV लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.ही कार प्रीमियम आणि लक्झरी SUV म्हणून ओळखली जाते.सध्या या महिन्यात ग्रँड विटाराच्या वेटिंग पीरियडमध्ये वाढ झाली असून, काही शहरांमध्ये डिलिव्हरीसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो.मात्र, काही ठिकाणी प्रतीक्षा कालावधी एक महिन्यापर्यंत वाढला आहे.
याशिवाय, मारुती या SUV वर 1.18 लाख रुपयांपर्यंतच्या सूटसह 5 वर्षांची मोफत एक्सटेंडेड वॉरंटी देखील देत आहे. ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत 11.19 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत अधिक असू शकते.

ग्रँड विटाराचे इंजिन आणि मायलेज
ग्रँड विटारा ही मारुती सुझुकी आणि टोयोटाने संयुक्तरित्या विकसित केली आहे. टोयोटाच्या हायरायडर SUV प्रमाणेच या SUV मध्येही माइल्ड-हायब्रिड आणि स्ट्रॉंग-हायब्रिड पॉवरट्रेनचे पर्याय देण्यात आले आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्स:1462cc K15 पेट्रोल इंजिन 100 BHP पॉवर (6000 RPM वर) आणि 135 Nm टॉर्क (4400 RPM वर) 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) पर्याय उपलब्ध आहे.
मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास : माइल्ड-हायब्रिड व्हेरिएंट – 21 kmpl पर्यंत तर स्ट्रॉंग-हायब्रिड व्हेरिएंट – 27.97 kmpl पर्यंत मायलेज देते.स्ट्रॉंग-हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही कार इंधन कार्यक्षमतेत आघाडीवर आहे. त्यामुळे, ती परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक SUV पैकी एक मानली जाते.
ग्रँड विटारा EV मोड
ही SUV EV मोड मध्ये देखील चालवता येते.हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ग्रँड विटारा फक्त इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीनेही धावू शकते,ज्यामुळे इंधनाची बचत होते.
हायब्रिड मोड: दोन्ही (इंधन आणि इलेक्ट्रिक मोटर) पॉवर वापरले जाते.
EV मोड: केवळ इलेक्ट्रिक मोटरवर गाडी चालते, इंजिन चार्जिंगसाठी कार्यरत असते.
बॅटरी चार्जिंग: जेव्हा इंजिन कार्यरत असते, तेव्हा बॅटरी आपोआप चार्ज होते.
यामुळे गाडीचे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होते आणि ती अधिक मायलेज देते.
सेफ्टी फीचर्स
ग्रँड विटारा ही सुरक्षित SUV म्हणूनही ओळखली जाते, कारण यात आधुनिक सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. मल्टीपल एअरबॅग्स (ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठी) ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) आणि EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन) ESP (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम) हिल होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल स्पीड अलर्ट आणि सीट बेल्ट अलर्ट पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरा ही सर्व वैशिष्ट्ये ग्रँड विटाराला सुरक्षित आणि आरामदायक SUV बनवतात.
स्पेशल फीचर्स
ग्रँड विटारामध्ये आधुनिक फीचर्सचा समावेश असून ती प्रीमियम SUV म्हणून ओळखली जाते.
इंटिरियर आणि टेक्नोलॉजी: पॅनोरामिक सनरूफ 360-डिग्री कॅमेरा (पार्किंग आणि सुरक्षिततेसाठी) डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Apple CarPlay आणि Android Auto सपोर्टसह) ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) – टायरमध्ये किती हवा आहे याची माहिती स्क्रीनवर मिळते.