Maruti Micro SUV : देशातील ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीकडून त्यांच्या नवीन कार लॉन्च करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. मारुती सुझुकीकडून आगामी काळात त्यांच्या आणखी नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
मारुती सुझुकी कार कंपनीकडून अद्याप त्यांची एकही इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र आता मारुती सुझुकीकडून त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारवर काम सुरु केले आहे.
तसेच मारुती सुझुकी त्यांच्या एका मायक्रो एसयूव्ही कारवर देखील काम करत असल्याचे बोलले जात आहे. मारुती सुझुकीची मायक्रो एसयूव्ही कार टाटा पंच आणि ह्युंदाई Exter ला टक्कर देईल. मारुती सुझुकीकडून 2026-2027 मध्ये त्यांची मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली जाईल.
मारुती सुझुकीकडून त्यांच्या मायक्रो एसयूव्ही कारची Y43 कोडनेम देखील दाखल करण्यात आला आहे. मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकीकडून मागील दोन वर्षात ग्रँड विटारा, फ्रॉन्क्स, न्यू ब्रेझा आणि जिमनी कार लाँच केल्या आहेत.
देशातील ऑटो मार्केटमधील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनीकडून नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. आता यावर्षी मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या भागीदारीतून अनेक कार सध्या बाजारात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मारुती त्यांच्या मायक्रो एसयूव्हीवर काम करत आहे.
मारुतीच्या आगामी मायक्रो एसयूव्हीची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कारला चांगला ग्राउंड क्लिअरन्स देण्यात येईल. मारुतीच्या मायक्रो एसयूव्ही कारमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, सहा एअरबॅग्ज, हेड-अप डिस्प्ले, ऑटोमॅटिक HVAC आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप अशी वैशिष्ट्ये देण्यात येतील.
मारुती मायक्रो एसयूव्ही इंजिन
मारुतीकडून त्यांच्या मायक्रो एसयूव्ही कारमध्ये 1.2-लिटर Z-सिरीज माईल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. मारुती आगामी काळात अनके शानदार नवीन कार लॉन्च करणार आहे.