गुड न्युज ! मारुती सुझूकीच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळतोय तब्बल 53 हजाराचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Maruti Suzuki Car Discount Offer : भारतात गेल्या काही वर्षात हॅचबॅक कारला मोठी मागणी आली आहे. या सेगमेंटमधील कार्सला मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये या सेगमेंटच्या कार्सला नेहमीच मोठी मागणी असते. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीच्या देखील अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत. मारुती सुझुकीच्या स्विफ्ट, बलेनो, अल्टो आणि एस-प्रेसो या कार खूपचं लोकप्रिय झालेल्या आहेत.

या गाड्या ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत आणि या कंपनीच्या हॉट सेलिंग कार्स देखील आहेत. दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसांत बजेट सेगमेंटमध्ये नवीन हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून आपल्या एका लोकप्रिय कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे.

ही कंपनी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक S-Presso वर बंपर सूट ऑफर करत आहे. या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 53 हजार 100 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण ही डिस्काउंट ऑफर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे डिस्काउंट ऑफर

मारुती सुझुकी एस-प्रेसोवर ग्राहकांना हजारो रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. याच्या ऑटोमॅटिक वेरिएंटवर 53,100 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

तसेच कंपनी मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरिएंटवर 48,100 रुपयांचा डिस्काउंट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट याचा समावेश राहणार आहे.

मात्र जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ही गाडी या चालू महिन्यातच खरेदी करावी लागणार आहे. ही ऑफर फक्त ऑगस्ट 2024 पर्यंत मर्यादित राहणार आहे.