आनंदाची बातमी ! मारुती सुझुकीच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळणार हजारो रुपयांचा डिस्काउंट

Tejas B Shelar
Published:
Maruti Suzuki Car Price Drop

Maruti Suzuki Car Price Drop : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकीची लोकप्रिय कार मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्ट कारवर कंपनीच्या माध्यमातून मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे जर तुम्हाला मारुती सुझुकीची फोर्थ जनरेशन स्विफ्ट कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून आधीच्या जनरेशनच्या स्विफ्ट कारवर देखील डिस्काउंट दिला जात आहे. मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी म्हणूनही ओळखली जाते.

या कंपनीची स्विफ्ट ही सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार म्हणून भारतीय कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत या गाडीचे चार जनरेशन लॉन्च झाले आहेत. ही गाडी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.

दरम्यान, आज आपण मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कार वर सुरू असणाऱ्या डिस्काउंट ऑफर ची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर. 

नवीन जनरेशनच्या स्विफ्टवर किती डिस्काउंट मिळतोय 

नवीन जनरेशनच्या पेट्रोल ऑटोमॅटिक अन पेट्रोल मॅन्युअल या स्विफ्ट कारवर 15,000 रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि दोन हजार रुपयाचा कार्पोरेट डिस्काउंट अशी एकूण 17 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 

जुन्या जनरेशनच्या स्विफ्टवर किती डिस्काउंट मिळतोय 

जुन्या जनरेशनच्या स्विफ्टवर देखील डिस्काउंट मिळतोय. जुन्या जनरेशनच्या पेट्रोल ऑटोमॅटिक Swift वर कॅश डिस्काउंट म्हणून 20000, एक्सचेंज बोनस म्हणून 15000, अतिरिक्त एक्सचेंज बोनस म्हणून 5000, कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून 2000 असा एकूण 42 हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे.

जुन्या जनरेशनच्या पेट्रोल मॅन्युअल स्विफ्टवर कॅश डिस्काउंट 15000, एक्सचेंज बोनस 15000, अतिरिक्त एक्सचेंज बोनस 5,000 अन कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून म्हणून 2000 असा एकूण 37 हजाराचा डिस्काउंट मिळणार आहे.

तसेच Swift CNG वर एक्सचेंज बोनस म्हणून 15,000 आणि कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून 2,000 असा एकूण 17 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe