जून महिन्यात स्वस्तात मिळतायेत Maruti Suzuki च्या कार्स ! वाचतील १ लाखांपर्यंत पैसे…

जून महिन्यात मारुती सुझुकीने Wagon R, Swift, Celerio, Brezza आदी मॉडेल्सवर ₹१ लाखांपर्यंत सूट जाहीर केली आहे. कॅश डिस्काउंटपासून अॅक्सेसरीजपर्यंत भरघोस फायदे मिळणार आहेत. स्टॉक मर्यादित असल्याने त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे.

Updated on -

Maruti Suzuki Offers 2025 : मित्रानों जून महिना सुरू झाला की पावसाची चाहूल लागते, आणि त्यासोबतच काही खास संधीही दाराशी येतात. या महिन्यात जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीने दिलेली ऑफर तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची उत्तम संधी ठरू शकते. देशातल्या लाखो कुटुंबांचं पहिलं पसंतीचं नाव असलेली मारुती, आता आपल्या Arena लाईनअपमधील काही लोकप्रिय मॉडेल्सवर मोठ्या सूटसह परतली आहे. कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज स्कीम आणि कॉर्पोरेट सूट अशा विविध सवलती मिळाल्यामुळे अनेकांना आता आपली पहिली घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे !

Wagon R वरील ऑफर काय आहे

सर्वसामान्य कुटुंबांची आवडती कार म्हणून ओळखली जाणारी Wagon R यावेळी विशेष चर्चेत आहे. जुन्या Wagon R च्या पेट्रोल-AMT व्हेरियंटवर तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे, जी ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नवीन मॉडेल घेण्याचा विचार असेल, तर सुद्धा 40,000 रुपयांची थेट सूट आणि इतर घटक धरून एकूण 95,000 रुपयांपर्यंतचा फायदा घेता येतो. पाच लाखांच्या आसपास सुरू होणारी ही कार खऱ्या अर्थाने ‘बजेट’ आणि ‘फॅमिली फ्रेंडली’ आहे.

Swift ऑफर वरील काय आहे ?

Swift चा चाहतावर्ग तर देशभर आहेच. स्पोर्टी लुक आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यामुळे ही कार युवकांपासून कुटुंबांपर्यंत सर्वांनाच भावते. यंदाच्या ऑफरमध्ये Swift च्या विविध मॅन्युअल व्हेरियंट्सवर 95,000 रुपयांपर्यंत सूट आहे, तर Blitz एडिशन घेणाऱ्यांना 75,000 रुपयांची सवलत मिळते. याशिवाय 50,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचं अॅक्सेसरीज पॅकही मोफत मिळतंय – म्हणजे सौंदर्य आणि सुविधा दोन्ही हातात.

Alto K10, S-Presso आणि Celerio ऑफर्स

Alto K10, S-Presso आणि Celerio या कॉम्पॅक्ट आणि शहरात वापरण्यास योग्य अशा कार्सवरही भरघोस सूट देण्यात आली आहे. Alto K10 आणि Celerio वर सुमारे 67,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो आहे. AMT व्हेरियंट्स घेणाऱ्यांना तर आणखी थोडीशी सवलत आहे. S-Pressoसाठीही एकूण 62,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट असून, यामध्ये रोख सूट आणि इतर फायदे एकत्रित दिले जात आहेत.

Brezza आणि Ertiga वरील ऑफर्स

थोडं अधिक स्पेस, स्टाईल आणि पॉवर हवी असेल, तर Brezza आणि Ertiga सारख्या मॉडेल्सकडे नजर वळते. Brezza च्या Zxi आणि Zxi Plus व्हेरियंटवर 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळतेय, तर CNG मॉडेल घेणाऱ्यांना 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आहे. Urbano एडिशनसाठी खास अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत, ज्यामुळे गाडीचं रूप अधिक उठून दिसतं. दुसरीकडे, Ertigaसाठी सध्या केवळ 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे, पण कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय असल्यामुळे ती मागणीमध्ये कायम राहीलच.

Maruti Eeco वरील ऑफर

Maruti Eeco ही व्यावसायिक वापरासाठी उत्तम पर्याय मानली जाते. CNG आणि Cargo व्हेरियंटवर 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे, जे व्यावसायिकांसाठी चांगली संधी ठरू शकते. अ‍ॅम्ब्युलन्स व्हेरियंटवर मात्र फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो.

या सगळ्या ऑफर्स ३० जून २०२५ पर्यंत लागू असणार आहेत. मात्र, स्टॉक मर्यादित असल्यामुळे आणि ऑफर्स डीलरशिपनुसार थोड्याफार बदलू शकतात, त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर जवळच्या अधिकृत मारुती डीलरशी संपर्क साधणं हिताचं ठरेल. शेवटी, स्वप्नातली कार घ्यायची असेल, तर वेळ आणि संधी दोन्ही साधणं फार गरजेचं आहे. यावेळी संधी तुमच्या दाराशी आली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe