Maruti Suzuki : देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुढील वर्षी जानेवारीपासून पुन्हा एकदा आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. सध्या कोणत्या मॉडेलवर किती वाढ होणार आहे याची माहिती दिलेली नाही.
मारुती सुझुकीने सांगितले की, “गेल्या एका वर्षात कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर अनेक इनपुट कॉस्ट वाढल्याने त्याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे या शुल्कातील काही रक्कम दरवाढीद्वारे ग्राहकांनी देणे अत्यावश्यक बनले आहे.
कंपनी देशात हॅचबॅक अल्टोपासून एस-क्रॉस एसयूव्हीपर्यंत अनेक मॉडेल्सची विक्री करते. 1 दिवसांपूर्वी कंपनीने नोव्हेंबरमधील कार विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण 1,59,044 युनिट्सची विक्री केली, जी नोव्हेंबर 2021 मध्ये 139,184 युनिट्सपेक्षा 14.26% जास्त होती.
दुसरीकडे, देशांतर्गत विक्रीमध्ये, मारुतीने गेल्या महिन्यात 1,35,055 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधील 113,017 युनिट्सपेक्षा जास्त आहे. कंपनीने गेल्या महिन्यात Alto, S Preso सारख्या मिनी सेगमेंटमध्ये 18,251 कार विकल्या आहेत.
मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2022 मध्ये 19,378 युनिट्सची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या 21,393 युनिट्सच्या निर्यातीच्या तुलनेत 7.73% कमी आहे.