Maruti Suzuki Crash Test : भारतीय ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक SUV – ई-विटारा लाँच करणार आहे. यंदाच्या भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये या गाडीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. दमदार रेंज, मॉडर्न फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन असलेली ही गाडी अनेक ग्राहकांच्या नजरेत आहे. पण खरी टेस्ट तिच्या सुरक्षिततेची आहे! लाँचिंगपूर्वी झालेल्या क्रॅश टेस्ट्स चा निकाल आता समोर आला आहे.
क्रॅश टेस्टमध्ये काय दिसून आले ?
ई-विटाराची क्रॅश टेस्ट करण्यात आली असून, प्राथमिक रिपोर्ट्सनुसार ही गाडी वेगवेगळ्या सेफ्टी स्टँडर्ड्सवर चाचणी घेतली गेली आहे. तथापि, ही चाचणी ग्लोबल NCAP किंवा भारत NCAP द्वारे अधिकृत नसून मारुती सुझुकीने स्वतः घेतलेली अंतर्गत चाचणी आहे. याचा अर्थ, अद्याप अधिकृत सेफ्टी रेटिंग घोषित करण्यात आलेले नाही. तरीही, प्राथमिक टेस्ट्सनुसार ही गाडी मजबूत स्ट्रक्चर आणि आवश्यक सेफ्टी फीचर्ससह चांगली परफॉर्म करत आहे.

सुरक्षिततेसाठी 7 एअरबॅग्स आणि लेव्हल 2 ADAS
मारुती सुझुकीने ई-विटारा अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यात 7 एअरबॅग्स, ABS आणि EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), 360-डिग्री कॅमेरा, आणि लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. यामुळे ही SUV अधिक सुरक्षित आणि ड्रायव्हर-फ्रेंडली असल्याचे दिसून येते.
दमदार बॅटरी आणि मोठी रेंज
ई-विटारामध्ये 49 kWh आणि 61 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक्स उपलब्ध असतील, जे 500 किमीपर्यंतची दमदार रेंज देऊ शकतात. त्याचबरोबर, ही गाडी गुजरातमधील प्लांटमध्ये तयार केली जाणार असून, भारतासोबतच जपान आणि युरोपमध्ये निर्यात केली जाणार आहे. साईजबद्दल बोलायचं झाल्यास – लांबी:4275 मिमी, रुंदी: 1800 मिमी, उंची: 1635 मिमी, व्हीलबेस: 2700 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स: 180 मिमी आहे.
किंमत किती असेल?
ई-विटाराच्या बुकिंगला सुरुवात झाली असून, ग्राहक ₹25,000 टोकन अमाउंट भरून ही गाडी बुक करू शकतात. मात्र, बुकिंग फक्त डीलरशिप स्तरावर सुरू आहे, आणि कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. गाडीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ₹18-20 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
उत्तम इलेक्ट्रिक SUV ठरू शकते
सेफ्टी : 8 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS असल्यामुळे सुरक्षिततेच्या बाबतीत ही गाडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
रेंज आणि बॅटरी : 500 किमी रेंज असल्यामुळे लॉन्ग ड्राईव्हसाठी ही एक उत्तम इलेक्ट्रिक SUV ठरू शकते.
डिझाईन आणि फीचर्स : स्टायलिश एक्सटेरियर आणि अत्याधुनिक इंटीरियरमुळे प्रीमियम फील मिळेल.
किंमत : मारुती सुझुकी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत असल्याने, प्राइसिंग कॉम्पेटेटिव्ह असेल असे वाटते.