Maruti Suzuki Eeco : भन्नाट ऑफर ! 1 लाखात खरेदी करा मारुतीची सर्वात जास्त विक्री होणारी ‘ही’ 7 सीटर कार; ऑफर पाहून होणार थक्क

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki Eeco : तुम्ही देखील तुमच्यासाठी 7 सीटर कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी 7 सीटर कार Maruti Suzuki Eeco अवघ्या एक लाखात खरेदी करू शकतात.

सध्या बाजारात  Maruti Suzuki Eeco धुमाकूळ घालत आहे. उत्तम फीचर्स आणि जबरदस्त मायलेजमुळे ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात नवीन  Maruti Suzuki Eeco खरेदीसाठी तुम्हाला 5.25 लाख ते 6.51 लाख रुपये खर्च करावे लागतात मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात तुमच्यासाठी  Maruti Suzuki Eeco खरेदी करू शकतात.

आज बाजारात  Maruti Suzuki Eeco च्या काही सेकंड हॅन्ड मॉडेल्सवर ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ज्याच्या लाभ घेऊन तुम्ही तुमच्यासाठी सेकंड हॅन्ड  Maruti Suzuki Eeco एक लाखात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती. हे जाणून घ्या ह्या ऑफर्स आम्ही तुमच्यासाठी Maruti Suzuki True Value कडून घेतले आहे.

eeco-exterior-right-front-three-quarter-14

Maruti Suzuki Eeco ऑफर्स

मारुती Eeco चे बेस मॉडेल मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू वर 2020 मॉडेल वर्षासह लिस्टिंग केले गेले आहे. ही पेट्रोल कार आहे आणि तिची पहिली मालकी आहे. या मारुती Eeco ने आत्तापर्यंत 17,903 किमी चालले आहे. सर्टिफाइड मारुती ईकोची किंमत विक्रेत्याने 1 लाख रुपये ठेवली आहे. ही MPV खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून 1 वर्षाची वॉरंटी, 3 फ्री सर्विस आणि सुलभ वित्त योजना देखील उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki Eeco  इंजिन आणि ट्रान्समिशन

मारुती सुझुकी Eeco मध्ये 1197 cc 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81PS पॉवर आणि 104.4Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Maruti Suzuki Eeco मायलेज

Maruti Suzuki Eeco च्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही MPV पेट्रोल इंजिनवर 19.71 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

हे पण वाचा :- Maruti Suzuki Brezza CNG : कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! भन्नाट फीचर्ससह मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी लॉन्च ; किंमत आहे फक्त ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe