Maruti Suzuki Grand Vitara Recall : मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मारुती सुझुकी ग्रँड विटारा खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक आणि कार विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
या कंपनीचे अनेक मॉडेल्स आपल्याला भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळतात. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग मारुती सुझुकीच्या गाड्या आपल्याला हमखास दिसतील. दरम्यान आता मारुती सुझुकीच्या एका लोकप्रिय मॉडेलमध्ये मोठा बिघाड समोर आला आहे.

यामुळे या कंपनीने आपल्या लोकप्रिय मॉडेलचे जवळपास 40,000 युनिट परत मागवले आहेत. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे.
कंपनीने घोषणा केली आहे की ती त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही, ग्रँड विटाराच्या 39,506 युनिट्स परत मागवत आहे. या एसयूव्ही 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या.
कंपनीने म्हटले आहे की, काही वाहनांमध्ये स्पीडोमीटर असेंब्लीमधील फ्यूल लेव्हल इंडिकेटर आणि वॉर्निंग लाईट खराब होत आहे, ज्यामुळे फ्युलची प्रॉपर माहिती मिळत नाहीये. दरम्यान आता याच बिघाड झालेल्या वाहनांच्या अनुषंगाने मारुती सुझुकी ने या गाड्या परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष बाब अशी की कंपनी स्वतः प्रभावित ग्राहकांशी थेट संपर्क साधेल आणि अधिकृत डीलरशिप वर्कशॉपमध्ये मोफत बदलण्याची व्यवस्था करणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फीचर्स आणि मायलेज बाबत माहिती पाहूयात.
गाडीचे फीचर्स आणि मायलेज
मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या लोकप्रियतेमागे इंधन कार्यक्षमता हे एक प्रमुख कारण आहे. मारुती सुझुकीच्या गाड्या या चांगले मायलेज देतात आणि यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये या गाड्या फारच लोकप्रिय झाल्या आहेत.
ज्या लोकांना चांगले मायलेज असणाऱ्या गाड्या हव्या असतात ते मारुती सुझुकीच्या वाहनांना पसंती दाखवतात. ग्रँड विटारा बाबत बोलायचं झालं तर ही गाडी चांगले मायलेज देते. 1.5 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड पेट्रोल इंजिनवाली ही गाडी 28 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती ग्रँड विटाराच्या या मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आहेत. अलिकडेच, मारुती सुझुकी ग्रँड विटाराने सर्व प्रकारांमध्ये सहा-एअरबॅग्ज सुद्धा ऑफर केल्या आहेत. देशभरातील मारुती सुझुकीच्या 3,500 हून अधिक मजबूत डीलरशिप आणि सेवा नेटवर्कमध्ये ग्रँड विटारा सहज उपलब्ध आहे.
मारुती ग्रँड विटारा लहान शहरांमध्येही सहज उपलब्ध आहे. शिवाय, मारुती सुझुकी ग्रँड विटारा खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून चांगली सेवा पण मिळत आहे. उत्कृष्ट विक्री-पश्चात सेवा देते. डिझाइन रस्त्याची उपस्थिती सुधारते
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची रचना देखील ग्राहकांना आकर्षित करते. एलईडी लाइटिंग सेटअप आणि नवीन प्रिसिजन-कट १७-इंच अलॉय व्हील्समुळे रस्त्यावरील तिची उपस्थिती वाढते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एसयूव्हीच्या केबिनमध्ये प्रभावी वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात.













