Maruti Suzuki Swift CNG : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास करणार आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी कंपनी लवकरच एक नवीन सीएनजी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या हॅचबॅक गाड्यांना ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. मारुती सुझुकीने आतापर्यंत अनेक हॅजबॅक मॉडेल लॉन्च केले आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट ही देखील अशीच एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. नुकतेच कंपनीने नवीन जनरेशन स्विफ्ट देखील लॉन्च केली आहे. या हॅचबॅक गाडीला नवीन Z-सीरीजचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
या कारच्या इंजिन मध्ये तर बदल झालाच आहे शिवाय या गाडीमध्ये अनेक भन्नाट फीचर्स अपलोड करण्यात आले आहेत. या कारचे सेफ्टी फिचर्स देखील सुधारले आहेत. या नव्याने लॉन्च झालेल्या Swift च्या बेस मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
खरे तर भारतात स्विफ्ट गाडीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. ग्रामीण भाग असो की शहरी भाग तुम्हाला स्विफ्ट गाडी सहज नजरेस पडणार आहे. गाडीची हीच लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने स्विफ्टचे नवीन जनरेशन लॉन्च केले आहे.
स्विफ्टचे हे चौथे जनरेशन असून आता याच गाडी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, नवीन मारुती स्विफ्टच्या लाइनअपमध्ये सीएनजी वॅरीयंट देखील जोडले जाणार आहे.
मारुती सुझुकीच्या इतर गाड्यांप्रमाणे, नवीन स्विफ्ट देखील फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह लॉन्च केली जाईल, असा दावा केला जात आहे.
हे किट कारच्या बूट स्पेसमध्ये बसवले जाणार आहे. या सेटअपमुळे, सीएनजी मॉडेल नियमित मॉडेलच्या तुलनेत कमी पॉवर आणि टॉर्क जनरेट करणार असे बोलले जात आहे.
दरम्यान, नजीकच्या भविष्यात लॉन्च होणाऱ्या या सीएनजी Swift च्या किमती बाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर नुकतीच लॉन्च झालेली नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्टची एक्स शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.50 लाख रुपये एवढी आहे.
दरम्यान या कारच्या आगामी काळात लॉन्च होणाऱ्या CNG मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 90,000 रुपयांनी जास्त असू शकते असे म्हटले जात आहे.