Maruti Suzuki : जर तुम्ही कमी किमतीत शानदार मायलेज आणि जबरदस्त फीचर्स असणारी कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता मारुती सुझुकीच्या काही कार्स 64,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत सहज खरेदी करू शकता.
जर तुम्ही मारुती सुझुकी बलेनो, इग्निस तसेच सियाझ सारख्या हॅचबॅक आणि सेडान खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला यावर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल आणि स्वस्तात शानदार कार घरी आणू शकता.
बलेनोवर होणार 35,000 रुपयांपर्यंत बचत
मारुती नेक्सा डीलरशिप जून महिन्यात प्रीमियम हॅचबॅक बलेनोवर 35,000 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात. सध्या बलेनोचे डेल्टा मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक व्हेरियंट हे 15,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर आणि एकूण 20,000 रुपयांच्या रोख सवलतीसह खरेदी करता येत आहेत.
यावर 10,000 रुपयांचा कॅशबॅक तसेच 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर इतर सर्व प्रकारांवर समान देण्यात येत आहे. इतकेच नाही तर बलेनोच्या सर्व CNG प्रकारांवर 25,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. जर किमतीचा विचार करायचा झाला तर बलेनोची सध्या किंमत एक्स-शोरूम किंमत 6.61 लाख ते 9.88 लाख रुपये इतकी आहे.
सुझुकी इग्निसपेक्षा होणार सगळ्यात मोठा फायदा
नेक्सा शोरूममध्ये मारुती सुझुकी इग्निस ही विक्री करणारी एंट्री लेव्हल कार असून या महिन्यात इग्निस खरेदी करत असणाऱ्यांना ६४,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यात 35,000 रुपयांचा कॅशबॅक, 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस तसेच Ignis च्या सर्व मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट्सवर 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. जर किमतीचा विचार केला तर सध्याची या कारची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख ते 8.16 लाख रुपये इतकी आहे.
मारुती सुझुकी सियाझ
मारुती सुझुकीची नेक्सा लाइनअप लोकप्रिय सेडान सियाझच्या सर्व प्रकारांवर 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे सध्या देण्यात येत आहे. या महिन्यात सियाझवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. परंतु कार खरेदीपूर्वी हे लक्षात ठेवा की सियाझवर रोख सवलत दिली जात नाही. कारची सध्याची एक्स-शोरूम किंमत सध्या 9.30 लाख ते 12.29 लाख रुपये इतकी आहे.