Maruti Suzuki Upcoming Car : आगामी काळात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी लवकरच एक नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतात मारुती सुझुकी ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.
या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी स्विफ्ट ही देखील अशीच एक लोकप्रिय कार आहे. या हॅचबॅक कारचा जलवा ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र पाहायला मिळत आहे. ही गाडी जेवढी शहरी भागात लोकप्रिय आहे तेवढीच ग्रामीण भागात देखील लोकप्रिय आहे.
दरम्यान कंपनीने या गाडीची लोकप्रियता पाहता मारुतीच्या नव्या पिढीतील स्विफ्टला भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. विशेष म्हणजे लॉन्च झाल्यापासूनच ही नवीन जनरेशनची स्विफ्ट ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
या गाडीला भारतीय कार मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये ही कार आता पुन्हा एकदा नंबर-1 बनली आहे. कंपनीने या नव्या जनरेशनच्या स्विफ्टमध्ये अनेक मूलभूत बदल केले आहेत. या गाडीचे डिझाइन सुद्धा बदलले गेले आहेत.
इंजिनमध्ये सुद्धा कंपनीकडून महत्त्वाचे बदल झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नव्या जनरेशनच्या स्विफ्टला जो प्रतिसाद मिळत आहे तो प्रतिसाद पाहता आता कंपनी या हॅचबॅकचे नवीन स्पोर्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक बातमी नुकतीच समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या आगामी स्पोर्ट मॉडेलची चाचणी सध्या जपानमधील सुझुकीच्या चाचणी कोर्समध्ये सुरू आहे. तसेच या वर्षी सप्टेंबरमध्ये हे स्विफ्टचे स्पोर्ट मॉडेल तेथे लॉन्च केले जाऊ शकते असा देखील दावा केला जात आहे.
ही गाडी सध्याच्या मॉडेलपेक्षा हलकी राहणार आहे. या गाडीचे वजन सुमारे 70 किलोग्रॅमने कमी केले जाणार असा अंदाज आहे. यामुळे ही गाडी उत्कृष्ट मायलेज देऊ शकणार आहे. परिणामी ग्राहकांमध्ये आगामी स्पोर्ट मॉडेल विशेष लोकप्रिय होईल असा विश्वास कंपनीला आहे.
मात्र या गाडीची किंमत ही थोडीशी जास्त राहणार आहे. कारण की या गाडीमध्ये नवीन इंजन दिले जाणार आहे. एवढेच नाही तर याचे फीचर्स देखील आधीच्या तुलनेत अधिक खास राहणार आहेत. यामुळे याची किंमत अधिक राहणार असा दावा होत आहे.