Maruti Suzuki : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठं अपडेट समोर आले आहे. मारुती सुझुकीने एक नवा डिस्काउंट ऑफर सुरु केला आहे.
यामुळे दिवाळीत कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हजार रुपये वाचणार आहेत. सरकारने सप्टेंबर मध्ये छोट्या कार्स वरील जीएसटी कमी केला आहे.

तसेच आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने ऑक्टोबरसाठी त्यांच्या काही कारवर डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे. कंपनीच्या उच्च मायलेज असलेल्या सेलेरियोचाही या डिस्काउंट ऑफर्स मध्ये समावेश करण्यात आला आहे.
कंपनी या कारवर 52 हजार पाचशे रुपयांची सवलत देत आहे. यामुळे बजेट कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट व कॅश डिस्काउंट असे लाभ दिले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी मोफत अॅक्सेसरीज सुद्धा देत आहे.
किंमत कशी आहे?
4 लाख 69 हजार 900 रुपये
किती मायलेज येते
पेट्रोल – 26.68 Km
CNG – 34.43 किलोमीटर
इंजिन कसे आहे
K10C ड्युअलजेट 1.0 लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल स्टार्ट/स्टॉप सिस्टम
66 एचपी व 89 एनएम टॉर्क
5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्स
एलएक्सआय व्हेरिएंटला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाही.
फिचर्स कसे आहेत
नवीन रेडिएंट फ्रंट ग्रिल
शार्प हेडलाइट युनिट्स आणि फॉग लाईट केसिंग्ज
फ्रंट बंपरमध्ये काळ्या रंगाचे अॅक्सेंट
साइड प्रोफाइल देखील आउटगोइंग मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळे
नवीन डिझाइनसह 15-इंच अलॉय व्हील्स
मागील बाजूस बॉडी-कलरचा रियर बंपर
फ्लुइड दिसणारा टेललाइट्स
कर्व्ही टेलगेट
एक्स्ट्रा बूट स्पेस
कारच्या आतील भागात हिल होल्ड असिस्ट
इंजिन स्टार्ट-स्टॉप
एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन
7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ डिस्प्ले (अँपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट)