Maruti Swift 2024 : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट आता नवीन रूपात भारतात लॉन्च होणार आहे. स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. मारुतीकडून नवीन स्विफ्ट कार लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
मारुती सुझुकीची नवीन जनरेशन स्विफ्ट कार अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. त्यामुळे कारचे डिझाईन आणि फीचर्स देखील लीक झाले आहेत. मारुती सुझुकीकडून त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिली जाणार आहेत.
स्विफ्ट कारला आणखी स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीकडून कारच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच कारच्या केबिनमधील अनेक फीचर्स नव्याने देण्यात येणार आहेत.
नवीन जनरेशन स्विफ्टला मिळणार 9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट
सध्याच्या स्विफ्ट कारमध्ये 7-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात येत आहे. मात्र नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक कारला 9-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्लेसह सादर केली जाऊ शकते. Grand Vitara, Brezza, Fronx आणि Baleno सारख्या कारमध्ये 9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात येत आहे.
ही सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीशी जोडलेली असेल. तसेच नवीन स्विफ्ट कारमध्ये वायरलेस फोन चार्जिंगसह अनेक खास फीचर्स दिले जाऊ शकतात.
360-डिग्री कॅमेरा
नवीन जनरेशन स्विफ्ट कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा देण्यात येईल. पार्किंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये हे फीचर्स जोडले जाणार आहे. त्यामुळे नवीन जनरेशन स्विफ्ट कार आणखी मजबूत असणार आहे. तसेच नवीन स्विफ्ट कारमध्ये Brezza, Frontex आणि Grand Vitara कारसारखे हेड-अप डिस्प्ले देण्यात येणार आहे.
6 एअरबॅग्जने सुसज्ज असणार नवीन स्विफ्ट
मारुती सुझुकीकडून त्यांच्या कारमध्ये प्रवाशांच्या दृष्टीने आता शानदार फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. आता आगामी नवीन जनरेशन स्विफ्ट कारमध्ये 6 एअरबॅग्ज पर्याय दिला जाऊ शकतो. तसेच अनके सेफ्टी फीचर्स कारमध्ये दिले जाणार आहेत.