मारुती स्विफ्ट खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Swift च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात

Published on -

Maruti Swift Car Price : भारत सरकारने दिवाळीच्या आधीच सर्वसामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्रातील सरकारने जीएसटीच्या दरात बदल करण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याची घोषणा केली.

12% आणि 28% हे जीएसटी चे दोन स्लॅब रद्द झाले आहेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% असे दोन स्लॅब शिल्लक आहेत. तसेच यावेळी केंद्रातील सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.

काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. छोट्या वाहनांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. आधी 1200 cc इंजिन व चार मीटर लांबी असणाऱ्या कार्सवर 28 टक्के जीएसटी होता.

तसेच यावर एक टक्के सेस पण लागायचा. मात्र सरकारने आता या वाहनांवरील जीएसटी दहा टक्क्यांनी कमी केला आहे. आता ही छोटी वाहने 18% जीएसटी स्लॅब मध्ये आली आहेत. खरंतर जीएसटीचे हे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे.

पण ग्राहकांना याचा फायदा आत्तापासूनच मिळू लागला आहे. काही कंपन्यांनी जीएसटी दरात झालेल्या बदलाची दखल घेत वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. मारुती सुझुकीने देखील आपल्या स्विफ्ट या लोकप्रिय कारची किंमत कमी केली आहे.

कंपनीची ही लोकप्रिय गाडी आता 81 हजार रुपये स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करायची असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

नव्या निर्णयामुळे मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडीची किंमत 8.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. ZXI Plus पेट्रोल ऑटोमॅटिक या वेरियंटची किंमत सर्वाधिक म्हणजेच 81,000 रुपये कमी झाली आहे. भारतीय कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या अनेक गाड्या बेस्ट सेलर ठरल्या आहेत.

कंपनीची स्विफ्ट देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाडींपैकी एक आहे. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग या गाडीची क्रेझ काही औरच आहे. आता या गाडीची किंमत कमी झाली असल्याने या गाडीची मागणी आणखी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News