मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV ‘या’ दिवशी होणार लाँच , सेफ्टी आणि फीचर्स जबरदस्त

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV ई-वितारा मे महिन्यात लाँच होणार असून, दोन बॅटरी पॅक, जबरदस्त फीचर्स आणि 10 रंग पर्यायांमध्ये ती ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. या कारच्या आकर्षक फीचर्सवरून एक नजर फिरवूया.

Published on -

Maruti E-Vitara | मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ‘ई-वितारा’ची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. ही कार आधीच सादर करण्यात आली होती, मात्र कंपनीकडून अद्याप तिची चाचणी सुरू आहे. आता बातमी मिळत आहे की ही दमदार इलेक्ट्रिक कार पुढील महिन्यात म्हणजे मे 2025 मध्ये भारतात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे काही डीलर्सनी आधीच तिचं ऑफलाइन प्री-बुकिंग सुरू केलं आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

परफॉर्मन्स कसा असणार?

मारुती E-Vitara दोन बॅटरी पॅक आणि तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाणार आहे. यात Sigma, Delta आणि Zeta हे ट्रिम्स असतील. 49 kWh बॅटरीसह Sigma व्हेरिएंटची किंमत सुमारे 18 लाख असेल, तर Delta साठी 19.50 लाख पर्यंत किंमत अपेक्षित आहे. Zeta व्हेरिएंट दोन्ही बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल. 61 kWh बॅटरीसह Zeta साठी किंमत 22.50 लाख, तर Alpha व्हेरिएंटसाठी 24 लाख पर्यंत असू शकते.

मारुतीची ई-वितारा एकूण 10 रंग पर्यायांमध्ये सादर केली जाणार आहे, ज्यात 6 मोनो-टोन आणि 4 ड्युअल-टोन पर्यायांचा समावेश आहे. सिंगल-टोन रंगांमध्ये Nexa Blue, Splendid Silver, Arctic White, Grandeur Grey, Bluish Black आणि Opulent Red यांचा समावेश आहे. ड्युअल-टोन मध्ये काळ्या रंगाचे छप्पर आणि A-B पिलर असलेले आकर्षक कॉम्बिनेशन दिलं जाणार आहे.

फीचर्समध्ये प्रीमियमचा अनुभव

मारुती E-Vitara मध्ये एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स आहेत. यात 10.25 इंचाचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, इन्फिनिटी ऑडिओ सिस्टिम, वायरलेस चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टीकलर अॅम्बियंट लाइटिंग, वन-पेडल ड्रायव्हिंग मोड, स्नो मोड आणि रिजन मोड यांचा समावेश आहे. शिवाय, 18 इंच व्हील्स आणि अ‍ॅक्टिव्ह एअर व्हेंट्ससह एक्सटिरीयर लुक खूप स्टायलिश आहे.

या कारमध्ये लेव्हल 2 ADAS फीचर्ससह लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट व रियर पार्किंग सेन्सर्स, 7 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि AVAS अलार्म सिस्टम दिले आहेत.

मारुतीची ही EV भारतातच नव्हे तर युरोप, जपान आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्येही लाँच होणार आहे. त्यामुळे कंपनीसाठी हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News