MG Upcoming Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कार मार्केटचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. आता भारतात सेडान ऐवजी SUV कार्सला अधिक मागणी आली आहे. एसयूव्ही कार असावी अशी तुमचीही इच्छा आहे ना ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ज्या लोकांना नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांना लवकरच भारतीय बाजारात एक नवीन ऑप्शन पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात MG Motors आपल्या एका लोकप्रिय SUV कारचे अपडेटेड वर्जन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. Gloster या SUV ची अपडेटेड आवृत्ती येत्या काही महिन्यांनी लॉन्च केली जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीची जय्यत तयारी सुरूय.
खरेतर अपडेटेड एमजी ग्लोस्टर भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. यामुळे या गाडीच्या फीचर्स बाबत जाणून घेण्याची लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे फीचर्स कसे राहू शकतात हे अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसे असतील फिचर्स ?
MG च्या या आगामी एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाणार आहे. याशिवाय, एसयूव्हीच्या आतील भागात डिजिटल टीएफटी युनिट देखील राहणार आहे. तर SUV च्या इंटिरिअरमध्ये सध्याच्या SUV पेक्षा काळ्या रंगाचा लेआउट आहे.
अपडेटेड एमजी ग्लोस्टर इंडिया-स्पेक मॉडेलला समोरच्या ग्रिलसह बाहेरील बाजूस अधिक क्रोम बिट्स मिळण्याची शक्यता आहे. फेसलिफ्ट केलेल्या मॉडेलमध्ये डे टाईम रनींग लॅम्प सोबत नव्याने डिझाईन करण्यात आलेले स्प्लिट-एलईडी हेडलॅम्प, नवे अलॉय व्हील, टेल लॅम्प सुद्धा नवीन असतील.
पॉवर ट्रेनमध्ये मात्र कोणताच बदल होणार नाही. सध्याचे २.० लीटर डिझेल इंजिन पॉवरट्रेन म्हणून सुरू ठेवले जाईल. पण ही फेसलिफ्ट एमजी ग्लोस्टर कधीपर्यंत भारतीय बाजारात धुमाकूळ घालायला येईल हे सांगणे थोडे कठीण आहे. कारण की, या गाडीची लॉन्च टाइमलाइन अद्याप घोषित झालेली नाही.
मात्र ही गाडी या चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता अधिक आहे. ही गाडी फॉर्च्यूनरसोबत स्पर्धा करणार असे बोलले जात आहे. पण ही गाडी फॉर्च्यूनरला खरंच टक्कर देते का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.