Affordable Automatic SUVs In India : निसान ते मारुती सुझुकी पर्यंत.. ‘या’ आहेत एकदम स्वस्तातल्या 5 ऑटोमॅटिक SUV , जाणून घ्या किंमत व फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

Affordable Automatic SUVs In India :- जपानची कार निर्माता कंपनी निसानने मॅग्नाइट एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीच्या नव्या ऑटोमॅटिक कारचे नाव निसान मॅग्नाइट एसयूव्ही ईझेड-शिफ्ट असे आहे.

निसानचा दावा आहे की, आपली नवीन कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. टाटा मोटर्स, ह्युंदाई, रेनो आणि मारुतीच्या इतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एसयूव्हीदेखील भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. चला तर मग पाहूया या कोणकोणत्या स्वस्त ऑटोमॅटिक एसयूव्ही उपलब्ध आहेत. त्याच्या फीचर्स आणि किंमती पाहुयात –

निसान मॅग्नाईट :-  निसान मोटर इंडियाने नुकतीच आपली मॅग्नाइट ईझेड-शिफ्ट ऑटोमॅटिक एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. याची एक्स शोरूम किंमत 6.50 लाख रुपयांपासून सुरू होते. याची बुकिंग सुरू आहे. ग्राहक 11000 रुपयांची टोकन रक्कम भरून ऑर्डर देऊ शकतात. लेटेस्ट मॅग्नाइट ईझेड-शिफ्ट ऑटोमॅटिक एसयूव्ही एक्सई, एक्सएल, एक्सव्ही आणि एक्सव्ही प्रीमियम या अनेक व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

यात 1.0 लीटर चे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन पर्यायासह 70 बीएचपीची कमाल पॉवर आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. नवीन ऑटोमेटेड मॅग्नाइट ईझेड-शिफ्ट एसयूव्हीची इंधन कार्यक्षमता 19.35-19.70 किमी प्रति लीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. नव्या कारमध्ये ड्युअल ड्रायव्हिंग मोड आणि इंटेलिजंट क्रेप फंक्शन सारखे काही महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत.

टाटा पंच :- टाटा पंच ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. याची एक्स शोरूम किंमत 7.50 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.2 लीटर चे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सद्वारे चालते जे 84 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. टाटा पंचचे मायलेज 18.82-18.97 किमी प्रति लीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Hyundai Exter :- ह्युंदाई एक्सेटर ही निसान मॅग्नाइट आणि टाटा पंचनंतर तिसरी सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक एसयूव्ही आहे. याची एक्स शोरूम किंमत 7.97 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑटोमॅटिक कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह 83 एचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. एक्सेटरच्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 19.4 किमी प्रति लिटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Renault Kiger :- रेनो काइगर ऑटोमॅटिकची एक्स शोरूम किंमत 8.55 लाख रुपयांपासून सुरू होते. काइगर दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 1.0 लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 71 एचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्ससह 98 एचपी पॉवर आणि 160 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Maruti Fronx :- स्वस्त ऑटोमॅटिक एसयूव्हीच्या या यादीत Maruti Fronx ही शेवटची कार आहे. ज्याची किंमत 8.88 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.2 नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन पर्याय देते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 22.89 किमी/लीटरचे उत्कृष्ट मायलेज देते.

 स्वस्तातल्या ऑटोमेटिक SUV ची प्राइस लिस्ट

ब्रँड मॉडेल किंमत (एक्स-शोरूम)
निसान मॅग्नाइट 6.50 लाख
टाटा पंच 7.50 लाख
Hyundai एक्सेटर 7.97 लाख
रेनॉल्ट किगर 8.55 लाख
Maruti Fronx 8.88 लाख

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe