New Car Lanch This Year: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यावर्षी भारतीय बाजारात मारुती सुझुकीपासून टाटासह अनेक ऑटो कंपन्या त्याच्या कार्स लाँच करणार आहे. जे तुम्ही खरेदी करू शकतात. तुम्ही देखील 2023 मध्ये कार खरेदी करणार असाल तर आम्ही आज तुम्हाला यावर्षी लाँच होणाऱ्या टॉप 10 कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही नवीन कार खरेदी करताना विचार करू शकतात.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बाजारात यावर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीसोबत टाटा पंच आणि अल्ट्रासचे सीएनजी व्हेरियंटही लॉन्च होऊ शकते. तसेच अनेक सेडान कार देखील बाजारात एन्ट्री करणार आहे. चला मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या कार्स बाजारात दाखल होणार आहे.

Maruti Suzuki Cars
मारुती सुझुकी या वर्षी अनेक नवीन कार लॉन्च करणार आहे ज्यात नवीन SUV फ्रँक्सचा समावेश आहे. ही SUV टाटा पंचला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे मारुती सुझुकी जिमनी महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येत आहे. या सर्वांसोबतच मारुती सुझुकी आपल्या बेस्ट एसयूव्ही ब्रेझाचे सीएनजी व्हेरियंटही सादर करणार आहे.
Tata Cars
Tata Motors यावर्षी CNG कार पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत आहे आणि आगामी काळात Tata Panch CNG सोबत Tata Altroz CNG देखील लॉन्च करणार आहे. Altroz रेसर देखील यावर्षी लॉन्च होणार आहे. यासोबत हॅरियर आणि सफारी सारख्या पावरफुल एसयूव्हीच्या डार्क रेड व्हर्जनही लाँच होणार आहेत.
Hyundai आणि Kia Cars
या वर्षी Kia Motors त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV Seltos चे फेसलिफ्टेड मॉडेल सादर करेल. यासोबत सॉनेट आणि कॅरेन्सचे सीएनजी व्हेरियंटही लॉन्च केले जाऊ शकतात. त्याच वेळी, Hyundai Motors लवकरच त्यांच्या प्रीमियम मिडसाईज सेडान Verna चे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे.
क्रेटा फेसलिफ्ट देखील यावर्षी लॉन्च होऊ शकते. Honda प्रीमियम सेडान होंडा सिटीचे फेसलिफ्टेड मॉडेल देखील यावर्षी लॉन्च होणार आहे. यासोबतच टोयोटा आपल्या इनोव्हा क्रिस्टा च्या 2023 मॉडेलची किंमत देखील लवकरच जाहीर करणार आहे. Citroën येत्या काही दिवसांत त्याच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार Citroën EC3 ची किंमत देखील उघड करणार आहे.
हे पण वाचा :- 2023 Tata Harrier : प्रतीक्षा संपली ! टाटाच्या ‘ह्या’ 2 पावरफुल एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू ; फीचर्स लावणार तुम्हाला वेड