New Electric Car : भारतीय ऑटो बाजारातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये 2023 मध्ये काही दमदार इलेक्ट्रिक कार्स लाँच होणार आहे. जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त फीचर्ससह जबरदस्त रेंज देऊ शकतात. यातच तुम्ही देखील येणाऱ्या काळात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात लवकरच MG मोटर देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार Air EV लाँच करणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने याची तयारी देखील सुरु केली असून आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार Air EV टेस्टिंग करताना रस्त्यांवर दिसली आहे. यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात ही कार बाजारात दाखल होणार असल्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी या कारमध्ये LEP-सेल बॅटरी पॅक वापरेल, ज्याची क्षमता सुमारे 20 ते 25kWH असू शकते. जरी ही कार आकाराने लहान असली तरी ही कार एका चार्जमध्ये 200 ते 300 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. कंपनी Air EV ला सिटी इलेक्ट्रिक कार म्हणून सादर करेल.
फीचर्स
या कारच्या पुढील बाजूस एलईडी लाइट बार आढळू शकतो. त्याच्या खाली सेंटरमध्ये चार्जिंग पॉइंट ठेवता येतो. Air EV ला वर्टीकल -स्टॅक केलेले ड्युअल-बॅरल हेडलाइट युनिट देखील मिळू शकते. ही कार वुलिंग एअर ईव्हीसारखे आहे. डॅशबोर्डमध्ये ट्विन डिस्प्ले आहे. AC व्हेंट स्लिम आहेत आणि इन्फोटेनमेंट युनिटच्या खाली ठेवलेले आहेत.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की हा 4-सीटर ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 17.3kWh आणि 26.7kWh बॅटरीचा समावेश आहे, जे अनुक्रमे 200 किमी आणि 300 किमी पर्यंतची रेंज देईल. एमजी मोटर इंडिया कारमध्ये काही आवश्यक बदलही करणार आहे. क्लाइमेट कंट्रोल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम प्रदान केली जाईल, जेणेकरून ही कार तीव्र उष्णता आणि हवामानातील बदलांना तोंड देऊ शकेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मात्र किंमत जाणून घेण्यासाठी आम्हाला कार लॉन्च होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
डायमेंशन
या इलेक्ट्रिक कारची डायमेंशन जागतिक बाजारपेठेत उपस्थित असलेल्या वुलिंग एअर ईव्हीच्या बरोबरीने असू शकतात. त्याची लांबी 2,974 मिमी, रुंदी 1,505 मिमी आणि उंची 1,631 मिमी असेल. या इलेक्ट्रिक कारचा व्हील बेस 2,010 मिमी असेल. म्हणजेच ही इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV पेक्षा लहान असेल.
हे पण वाचा :- iPhone 14 Discount : स्वप्न करा पूर्ण ! फक्त 44,999 रुपयांमध्ये आयफोन 14 खरेदीची उत्तम संधी ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर