New Electric Scooter : आज संपूर्ण देशभर विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज अनेकांनी नवीन वाहनांची खरेदी केली असेल. तर काहीजण येत्या दिवाळीला नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
खरंतर लवकरच भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता रिव्हर मोबिलिटी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनी लोकप्रिय इंडी इलेक्ट्रिक स्कूटरचे जनरेशन 3 मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या कंपनीचा इलेक्ट्रिक स्कूटर दीड लाखांच्या आत ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.

बेंगळुरूमध्ये या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.46 लाख रुपये आहे. यामुळे ग्राहकांकडून या स्कूटरला चांगला प्रतिसाद मिळणार अशी आशा आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यासोबतच कंपनीने दिल्लीमध्ये आपले पहिले स्टोअर सुद्धा सुरू केले आहे. आता आपण नव्याने लॉन्च झालेल्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये नेमके काय काय फीचर्स आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
कसे आहेत फिचर्स ?
कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या स्कूटरमध्ये अनेक अॅप-बेस्ड फीचर्स जोडलेले आहेत. या नव्या फीचर्स मुळे मोबाईल अॅपवरून रिअल-टाइम चार्जिंग स्टेटस, रायडिंग डेटा व विविध कस्टमाइजेशन पर्याय उपलब्ध झाले आहेत. या नव्या मॉडेलमध्ये 6-इंची डिस्प्ले, हिल-होल्ड असिस्ट व अधिक मजबूत ग्रिप असलेले टायर्स दिलेले आहेत.
या नव्या इलेक्ट्रिक स्कूटर ला कंपनीने 14-इंच अलॉय व्हील्स दिलेले आहेत. यामुळे आता खडतर रस्त्यांवरही ग्राहकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या स्कूटरची पुढच्या टायरची साईज 110/70 तर मागच्या टायरची साईज 120/70 आहे.
हा नवा स्कूटर परफॉर्मन्स मध्ये सुद्धा फारच शानदार आहे. रिव्हर इंडी जनरेशन 3 मध्ये 4-kWh बॅटरी पॅक आहे. हा स्कूटर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 750-वॅट चार्जरद्वारे याची बॅटरी पाच तासात 80% चार्ज होते. ही स्कूटर 161 किलोमीटरची रेंज देत आहे.
इकोमोड मध्ये चालवल्यास ग्राहकांना 110 km ची रेंज मिळू शकते. तसेच राइड मोडमध्ये 90 किमी व रश मोडमध्ये 70 किमीची रेंज मिळणार असा दावा करण्यात आला आहे. याच्या डिझाईनमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
यामध्ये ट्विन बीम LED हेडलाइट्स, LED इंडिकेटर्स, फ्लॅट फ्लोअरबोर्ड, स्टेप-अप सीट डिझाईन व फोल्डेबल फुटपॅग देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी स्कूटरमध्ये 240mm फ्रंट व 200mm रियर डिस्क ब्रेक्स सुद्धा देण्यात आले आहेत. ही नव्याने लॉन्च झालेली स्कूटर ओला, टीव्हीएस, एथर व बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत स्पर्धा करणार आहे.