New Maruti Baleno:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मारुती सुझुकीने पुन्हा एकदा आपली लोकप्रिय हॅचबॅक कार बलेनो नवीन रूपात सादर केली आहे. नवीन बलेनो 2024 अधिक प्रीमियम डिझाइन, सुधारित मायलेज आणि उच्च दर्जाच्या सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांसह उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही स्टायलिश आणि इंधन-कार्यक्षम हॅचबॅकच्या शोधात असाल तर बलेनो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.
आकर्षक डिझाइन आणि वैशिष्ट्यपूर्ण इंटीरियर
नवीन बलेनो स्पोर्टी आणि आकर्षक लूकसह बाजारात आली आहे. तिच्या पुढील भागात स्टायलिश हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), नवीन डिझाइनचा ग्रिल आणि सुधारित फॉग लॅम्प यामुळे गाडीला अधिक आधुनिक आणि आकर्षक लूक मिळतो. याशिवाय आकर्षक अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस सुधारित एलईडी टेललॅम्प्स तिच्या स्पोर्टीनेसला अधिक आकर्षक बनवतात.
कसे आहे इंटिरियर?
कारच्या अंतर्गत डिझाइनबाबत बोलायचे झाले तर प्रीमियम ड्युअल-टोन इंटीरियर, सॉफ्ट-टच मटेरियल आणि अॅडजस्टेबल सीट्स यामुळे प्रवास अधिक आरामदायी बनतो. 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर साउंड सिस्टम, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्टसह हाय-टेक फीचर्स प्रदान करते. याशिवाय क्रूझ कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधाही यात देण्यात आल्या आहेत.
दमदार इंजिन आणि अप्रतिम मायलेज
बलेनो 2024 मध्ये 1.2 लिटर के-सिरीज ड्युअलजेट व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 89 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशनसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, मॅन्युअल ट्रान्समिशनसह बलेनो 23.46 किमी/लीटर इतके मायलेज देते, तर एएमटी व्हेरिएंट 24.12 किमी/लीटर मायलेज देते.
सीएनजी व्हेरिएंटच्या बाबतीतही बलेनोने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सीएनजी प्रकार सुमारे 30.61 किमी/किलो मायलेज प्रदान करते.ज्यामुळे ही गाडी इंधन किफायतशीरतेच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय ठरते.
सुरक्षितता आणि प्रगत तंत्रज्ञान
बलेनो 2024 मध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, मागील पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट यासारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे ही गाडी केवळ आरामदायीच नाही तर सुरक्षित प्रवासासाठीही सर्वोत्तम पर्याय आहे.
किंमत आणि विविध प्रकार
बलेनो 2024 विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा हे प्रकार समाविष्ट आहेत. बेस व्हेरिएंट सिग्माची किंमत 6.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि अल्फा व्हेरिएंटसाठी किंमत अधिक वाढते. व्हेरिएंटनुसार विविध फीचर्स आणि सुविधांमध्ये बदल होतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येतो.
बाजारातील लोकप्रियता आणि विक्री
मारुती सुझुकी बलेनोने भारतीय बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळवला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 189770 युनिट्स विकले गेल्या आहेत. जे ग्राहकांच्या विश्वासाचे आणि गाडीच्या यशाचे स्पष्ट उदाहरण आहे. प्रीमियम वैशिष्ट्ये, उच्च मायलेज आणि सुरक्षिततेसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देणारी बलेनो हॅचबॅक सेगमेंटमधील एक मजबूत स्पर्धक ठरली आहे.