कार बाजारात धुमाकूळ घालायला येत आहे नवीन Swift! देईल २६ किमी मायलेज; जाणून घ्या फीचर्स

भारतीय कार बाजारात मारुती सुजुकीची स्विफ्ट ही कार एक अत्यंत लोकप्रिय कार आहे. स्विफ्टचे आकर्षक लूक, उत्कृष्ट प्रदर्शन आणि आधुनिक फीचर्स यामुळे ती ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरली आहे.

Published on -

New Maruti Hybrid Swift:- भारतीय कार बाजारात मारुती सुजुकीची स्विफ्ट ही कार एक अत्यंत लोकप्रिय कार आहे. स्विफ्टचे आकर्षक लूक, उत्कृष्ट प्रदर्शन आणि आधुनिक फीचर्स यामुळे ती ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरली आहे.

आता स्विफ्टचा हायब्रिड व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे व ज्याची चाचणी सध्या सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये ही कार दिसून आली आहे आणि लवकरच या गाडीचे लाँच होण्याची शक्यता आहे.

मारुती स्विफ्ट हायब्रिडचे सुरक्षा फीचर्स

स्विफ्टच्या नवीन हायब्रिड व्हर्जनमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांना प्राधान्य दिले गेले आहे. या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ३-पॉइंट सीट बेल्ट्स, हिल होल्ड कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम,

इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि ADAS यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स आहेत. हे सर्व फीचर्स कारला अधिक सुरक्षित आणि ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी आरामदायक बनवतात.

अशी सुरक्षा यंत्रणा असल्यामुळे स्विफ्ट हायब्रिडला ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळण्याची मोठी शक्यता आहे. याआधी मारुतीच्या नवीन डिझायरने देखील ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे. स्विफ्टच्या क्रॅश चाचणी रिपोर्टनंतर याचे अंतिम निष्कर्ष समोर येतील.

इंजिन आणि पॉवर

स्विफ्ट हायब्रिडमध्ये १.२ लिटर Z12E पेट्रोल इंजिन असणार आहे. जे उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाइन केले गेले आहे. या इंजिनमध्ये माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश केला जातो.

ज्यामुळे इंधनाच्या वापरामध्ये बचत होईल आणि कारचे परफॉर्मन्स देखील सुधारेल. स्विफ्ट हायब्रिडमध्ये CVT गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे.

ज्यामुळे गाडीला अधिक स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव मिळेल. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे या कारचे मायलेज लक्षणीयरीत्या सुधारेल. मॅन्युअल गिअरबॉक्सवर ती २४.८ किमी प्रति लिटर आणि एएमटी गिअरबॉक्सवर २६ किमी प्रति लिटर मायलेज देऊ शकते.

नवीन तंत्रज्ञान आणि आकर्षक वैशिष्ट्ये

स्विफ्ट हायब्रिडमध्ये ९ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, स्मार्ट रिव्हर्स पार्किंग सिस्टीम आणि अनेक स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील समाविष्ट असतील. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रायव्हिंग अनुभव अधिक आनंददायक होईल.

स्विफ्ट हायब्रिडच्या इंटीरियर्समध्ये स्टाइलिश आणि आरामदायक डिझाईन असण्याची अपेक्षा आहे. तसेच, इन्फोटेनमेंट सिस्टीमला स्मार्टफोनशी कनेक्ट करून तुम्ही आपली आवडती गाणी आणि मॅप्स वापरू शकता.

लाँच तारीख आणि किंमत

मारुती स्विफ्ट हायब्रिड कारची किंमत सध्या स्विफ्टच्या विद्यमान मॉडेलच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. जी ₹6.49 लाखांपासून सुरू होते. या नवीन हायब्रिड मॉडेलचा लाँच यावर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. स्विफ्ट हायब्रिडमध्ये सुधारित मायलेज, उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे व ज्यामुळे ती ग्राहकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!