नवीन 2025 MG Astor लॉन्च! 10 लाखात मिळणार 49 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स आणि पॅनोरेमिक सनरूफ

JSW-MG इंडियाने भारतात 2025 मॉडेल MG अ‍ॅस्टर कॉम्पॅक्ट SUV लाँच केली आहे. या नवीन अपडेटेड मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणेच 49 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यामध्ये लेव्हल-2 अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि वैयक्तिक AI सहाय्याचा समावेश आहे.

Published on -

New MG Astor SUV:- JSW-MG इंडियाने भारतात 2025 मॉडेल MG अ‍ॅस्टर कॉम्पॅक्ट SUV लाँच केली आहे. या नवीन अपडेटेड मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणेच 49 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यामध्ये लेव्हल-2 अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि वैयक्तिक AI सहाय्याचा समावेश आहे. या गाडीत नवीन बदल मुख्यतः तिच्या मिड-व्हेरियंट असलेल्या शाइन आणि सिलेक्टमध्ये करण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि आधुनिक फीचर्स मिळणार आहेत.

शाइन व्हेरियंटमध्ये मिळणारे फीचर्स

शाइन व्हेरियंटमध्ये आता पॅनोरॅमिक सनरूफ आणि 6-स्पीकर साउंड सिस्टम समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही तिच्या सेगमेंटमधील पहिली SUV आहे, जी 12.5 लाखांपेक्षा कमी किंमतीत पॅनोरॅमिक सनरूफसह उपलब्ध आहे. त्याच वेळी सिलेक्ट व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज आणि लेदरेट सीट अपहोल्स्ट्रीचा समावेश करण्यात आला आहे.

ज्यामुळे या कारच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ झाली आहे. मात्र या अपडेट्समुळे MG अ‍ॅस्टरच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. शाइन पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 36,000 रुपयांनी वाढली आहे.

तर सिलेक्ट मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किमतीत 38,000 रुपयांची वाढ झाली आहे. तरीसुद्धा या कारची सुरुवातीची किंमत अजूनही 10 लाख (एक्स-शोरूम) आहे.

या कारमध्ये कोणते करण्यात आले आहेत बदल?

2025 MG अ‍ॅस्टरच्या डिझाइनमध्ये कोणतेही कॉस्मेटिक किंवा यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत. यामध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो-डिमिंग IRVM, आणि वायरलेस फोन चार्जर यांचा समावेश आहे. या SUV मध्ये एकूण 49+ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 360-डिग्री अराउंड व्ह्यू कॅमेरा आणि 14 लेव्हल-2 ADAS फीचर्स आहेत. यामुळे गाडी चालवताना अतिरिक्त सुरक्षा मिळते.

या SUV मध्ये 10.1-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी स्मार्ट 2.0 UI सह अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये अधिक कनेक्टेड कार फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

जसे की, हवामान अपडेट्स, ताज्या बातम्या, कॅल्क्युलेटर आणि जिओ व्हॉइस रेकग्निशन सिस्टमसह व्हॉइस कमांड सपोर्ट. याशिवाय ही इन्फोटेनमेंट सिस्टम आता वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

देण्यात आलेली सुरक्षा फीचर्स

सुरक्षा वैशिष्ट्यांच्या बाबतीत, 2025 MG अ‍ॅस्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल असिस्ट आणि डिसेंट कंट्रोल तसेच गरम केलेले ORVM देण्यात आले आहेत. ADAS सुविधांमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन-कीपिंग आणि डिपार्चर असिस्ट तसेच ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यांचा समावेश आहे जे सुरक्षित आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देते.

कसे आहे इंजिन?

परफॉर्मन्सच्या बाबतीत MG अ‍ॅस्टरच्या इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह येते. पहिला पर्याय 1.5-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे.

जे 110 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरा पर्याय 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.जे 140 PS पॉवर आणि 220 Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि CVT गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत.

भारतात MG अ‍ॅस्टरची मुख्य स्पर्धा किआ सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, होंडा एलिव्हेट, फोक्सवॅगन टायगुन आणि स्कोडा कुशक यांसारख्या लोकप्रिय SUV सोबत आहे. आधुनिक फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे 2025 MG अ‍ॅस्टर भारतीय बाजारात एक आकर्षक पर्याय ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe